Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा

महात्मा फुले हायस्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा

219

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.28फेब्रुवारी):- शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज [ वि वा शिरवाडकर ] यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मराठी विषय शिक्षक एस एन कोळी यांनी मराठी राजभाषा दिनाची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. मराठी आपली मातृभाषा आहे आणि सर्वांनी मात्र भाषेचा सन्मान केला पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम बी मोरे, शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, एम के कापडणे, सी एम भोळे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, श्रीमती एम जे महाजन तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एच डी माळी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here