


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.27फेब्रुवारी):- तालुक्यातील खंडाळी या गावातील व पिंपळदरी पोलीस ठाण्यातील अंतर्गत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व्यंकट दादाराव मुंडे मागील दोन चार वर्षापासून पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी व पिंपळदरी पोलीस ठाण्यात चक्रा मारत असून पोलीसच अन्याय करत असून पोलीसां कडूनच पोलिसाला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
पिंपदरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करून न्याय मिळत नसल्याने देहदानाचा इशारा यावेळी व्यंकट मुंडे यांनी दिला आहे.सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी वेंकट मुंडे यांची गंगाखेड तालुक्यातील खंडाळी या गावी गट क्रमांक 149 मध्ये एक हेक्टर 32 आर जमीन असून त्या जमिनीची सातबारा नोंद व्यंकट दादाराव मुंडे यांच्या नावे आहे पण त्यांचा चुलत भाऊ दिगंबर मुंडे हे ती जमीन मी खरेदी केली असे सांगत आहे, अशा पद्धतीने अडीहरकती करीत शेतावर अतिक्रमण करून शेती लाटण्याचा डाव असल्याचे व्यंकट मुंडे यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड यांना व्यंकट मुंडे यांनी प्रत्यक्षात भेटून या प्रकरणाची पूर्ण माहिती दिली त्यांनी लेखी कळवले गुन्हा नोंद करावा पण पिंपळदरी येथील पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा नोंद केला नाही. दिगंबर मुंडे यांना व्यंकटी मुंडे यांनी शेती विक्री केली आहे असे म्हणत आहेत.
जर शेती विक्री केलेले असेल तर काही लेखी पुरावे असेल तर मला दाखवण्यात यावे अशी मागणी व्यंकट मुंडे हे वारंवार पोलिसांना करत आहेत.दिगंबर मुंडे हे तोंडी करार झाला असे म्हणतात पण शेती विक्रीचा व्यवहार हा तोंडी नाही तर खरेदी खताच्या आधारावर खरेदी विक्री केला जातो, तोंडी व्यवहार होत नाही सदरील जमिनीची सातबारा ही माझ्या नावे आहे, 2023 या वर्षाचा पीक पेरा ही माझ्या नावे असून माझ्या शेतीवर डिगांबर मुंडे यांनी अतिक्रमण केले असून हे अतिक्रमण हटविण्यासाठी व्यंकट मुंडे यांच्याकडून पोलीस संरक्षण देखील मागण्यात आले होते परंतु पोलीस प्रशासन संरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्याचेही व्यंकट मुंडे यांच्या वतीने सांगण्यात आले सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस अधिकारी व कर्मचारी कडून त्रास होत असेल तर न्याय कुणाकडे महागाव असा प्रश्न व्यंकट मुंडे यांच्या मनात उपस्थित झाला आहे.न्याय मिळत नसल्याने शेवटी त्यांनी दोषीवर कारवाई करून मला माझा शेताचा ताबा देण्यात यावा असे लेखी मागणी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक परभणी यांच्याकडे केली आहे अन्यथा देहत्याग करणार असल्याचेही त्यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे.













