


✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड (दि.24 फेब्रुवारी):-शहरामध्ये भारतरत्न,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक वर्षापूर्वी नवीन पुतळा बसविण्यात आला.
पण एका वर्षामध्ये ह्या नवीन पुतळ्याचा कलर निघत आहे.
ही बाब नप मुख्याधिकारी साहेब यांना प्रफुल दिवेकर (युवा सामाजिक कार्यकर्ते) व सिद्धार्थ दिवेकर (पत्रकार) यांनी प्रत्यक्ष भेटून अर्जमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याची कलरिंग त्वरित करण्यात यावी.अशी मागणी केली आहे.
यावेळी भिम टायगर सेना शहराध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर (युवा सामाजिक कार्यकर्ते) बुद्धभूषण इंगोले हे उपस्थित होते.













