Home बीड कांदा, सोयाबीन व कापसाच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल – बाजीराव ढाकणे

कांदा, सोयाबीन व कापसाच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल – बाजीराव ढाकणे

160

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.23फेब्रुवारी):- बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा, सोयाबीन व कापसाचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी कांदा, सोयाबीन व कापसाचा उत्पादन खर्च वाढला असून बाजारात कांदा, सोयाबीन व कापसाचे भाव कमी झाले आहेत. यामुळे सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्यांकडे कापूस नव्हता तोपर्यंत कापसाचे भाव गगनाला भिडलेले होते आणि आज शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी घरात कापूस उपलब्ध आहे तर कापसाच्या भावाने निश्चांक गाठला आहे.

या परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी जर सात ते आठ हजार रुपये भावाने कापूस विक्री केला तर शेतकऱ्यांला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे कारण शेतकऱ्याला एक क्विंटल कापसाचे उत्पन्न घेण्यासाठी आठ ते दहा हजार रुपये खर्च येतोय म्हणूनच जर त्यामध्ये नफा तर सोडाच पण मुद्दल खर्च पण मिळणार नसेल तर मग शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनासाठी आणि गरजांसाठी लागणारा पैसा शेतकऱ्यांनी कुठून उपलब्ध करायचा शिवाय घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. आज कापसाचा भाव न वाढणे हे सुलतानी संकट आहे याला सरकार व सरकारी नीती जबाबदार आहे असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.

आज कमी भावात कापूस घालून जेव्हा शेतकऱ्यांकडील कापूस संपेल त्यानंतर व्यापाऱ्याकडे असणाऱ्या कापसाला 14000 हजारांपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे यामध्ये सरकारी धोरण हे व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे व शेतकऱ्यांचा कर्दनकाळ आहे ही गोष्ट लक्षात येते. म्हणूनच सरकारने ताबडतोब कसलाही विचार न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी जे करता येईल ते केलं पाहिजे. कापसाला किमान 16000 रुपये तर कमाल 18000 रुपये एवढा भाव दिला पाहिजे तरच शेतकरी आणि शेतमजूर सुखी होईल. अन्यथा शेतकऱ्यांला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. ही गोष्ट सरकारने आणि प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे एका बाजूला शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही झटत आहोत अशी भूमिका मांडणारे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या कांदा, सोयाबीन व कापसाला योग्य भाव देऊ शकत नाही ही गोष्ट निर्लज्जपणाचे लक्षण आहे.

म्हणून सरकारने सर्व स्तरावर प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव द्यावा अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. कांदा सोयाबीन व कापसाला योग्य भाव द्यावा.तसेच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर आहे. सोयाबीनचे भाव पण अतिशय कमी झाले आहेत. एक क्विंटल सोयाबीन तयार करण्यासाठी जवळपास 7000 हजार रुपये खर्च येतो. आणि बाजारात 5200 दोनशे रुपये भाव मिळतो आहे. तरी सरकारी यंत्रणेने तात्काळ भाव वाढवून सोयाबीनची खरेदी केली पाहिजे.

एक किलो कांदा तयार होण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च करावा लागतो त्यांच बरोबर अपार कष्ट करावी लागतात त्यामुळे कांद्याचे भाव किमान 25 रुपये किलो झाले पाहिजेत. तरच शेतकऱ्यांला आपला दैनंदिन जीवनातील गरजा भागविण्यासाठी दोन पैसे हाती पडतील कांदा ,कापसाबरोबरच तुरीचा आणि सोयाबीनचा भाव देखील वाढला पाहिजे अशी मागणी बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत दिली पाहिजे. असे हि बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here