


✒️शेख आतिख(विशेष प्रतिनिधी)
तलवाडा(दि.19फेब्रुवारी):-गेवराई तालुक्यातील राहेरी येथील भूमिपुत्र तथा चित्रकार उद्देश पघळ व त्यांचे पुणे येथील सहकारी मित्र नितीन पवार यांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतीतून तसेच तलवाडा येथील डॉक्टर्स, पत्रकार, शिक्षकवृंद, शालेय विद्यार्थी आणि युवक वर्गांच्या सहभागातून श्रीक्षेत्र त्वरितादेवी गडाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवरायांचे १३००० हजार चौरस फुटाचे भव्यदिव्य रेखाचित्र प्रथमच डोंगर दऱ्यावर रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला असून रविवारी या गडावर प्रतिमेचे पूजन व भगवा ध्वज फडकावून छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे.
शिवप्रेम केवळ एकदोन दिवसांपुरते न दाखवता, शिवरायांचे आचार, विचार आणि त्यांनी अनेकविध प्रसंगांमधून दिलेले लाखमोलाचे संदेश नित्य जोपासणाऱ्या तलवाड्याच्या मावळ्यांनी त्वरितादेवी गडावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३००० हजार चौरस फुटाचे भव्यदिव्य रेखाचित्र रेखाटून तसेच त्या रेखाचित्राच्या वरील भागात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व भगवा ध्वज फडकावून शिवरायांना अनोखी मानवंदना देण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे, बाळराजे कंस्ट्रक्शनचे मालक बप्पासाहेब घाटूळ (नाना), वडार समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष – राजाभाऊ विटकर, सरपंच पती विष्णू तात्या हात्ते, संत रविदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष – तुळशीराम वाघमारे, प्रा.गणपत नाटकर सर, डॉ.आसाराम मराठे, डॉ.किशोर गर्जे, सुनिल गवांडे, दुरेश जिजा यादव, आसाराम माने, दत्ता देशमुख, विजय डोंगरे सर, राठोड सर, प्रकाश चव्हाण सर, सुरेश शिंदे, जेष्ठ पत्रकार आतिख शेख, सचिन डोंगरे, विष्णू राठोड, डॉ.सुरेश गांधले, अशोक शिंदे, प्रल्हाद मरकड, शुभम जैत, नारायण मरकड, भरत शिंगणे, अशोक सुरासे यांच्यासह तलवाडा व परिसरातील शेकडो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.













