Home महाराष्ट्र यिन अध्यक्षपदी आचल दांडेकर तर उपाध्यक्षपदी वैष्णवी भलमे

यिन अध्यक्षपदी आचल दांडेकर तर उपाध्यक्षपदी वैष्णवी भलमे

179

🔹आठवले समाजकार्य महाविद्यालयात पार पडली निवडणूक

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर(प्रतिनिधी)

चिमूर(दि.11फेब्रुवारी):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे सकाळ माध्यम समूहाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या यिन मिनिस्ट्री प्रकल्पाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्ष पदावर कुमारी आचल मोहन दांडेकर तर उपाध्यक्षपदी कुमारी वैष्णवी विकासराव भलमे ही बहुमताने विजयी झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणाचा विकास व्हावा या उद्देशाने यिन मिनिस्ट्री प्रकल्प राबविण्यात येतो, ज्यामध्ये यंग इन्स्पायर नेटवर्क च्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणुकी द्वारे नियुक्त करून त्यांचे नेटवर्क तयार करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून चिमूर येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात सदर निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये एकूण 57 विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार बजविला. ज्यामध्ये कुमारी आचल दांडेकर हिला 31 मते मिळाली तर उपाध्यक्ष पदावर असलेली उमेदवार कुमारी वैष्णवी भलमे हिला 32 मते मिळाली. दोन मते अवैद्य घोषित करण्यात आली. विजयी उमेदवार आचल दांडेकर हिला सौरभ बंडू मेश्राम याने टक्कर देत 24 मते मिळविली परंतु त्याला पराभव पतकरावा लागला. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी वैष्णवी भलमे हिच्या विरुद्ध चंदन पाटील याने 22 मते मिळविली त्याला सुद्धा निवडणुकीतून पराभवी व्हावे लागले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर यांनी विजयी उमेदवारांना गुलाल तिलक लावून अभिनंदन केले. निवडणुकीकरिता अध्यासी अधिकारी म्हणून प्रा. डॉ. चंद्रभान खंगार यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांचे सहकारी म्हणून प्रा. डॉ. मुरलीधर रेवतकर, प्रा. शिल्पा गणवीर, प्रा डॉ दिवाकर कुंमरे, प्रा राजू रामटेके हजर होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here