Home महाराष्ट्र उमरखेड शहरात प्रथमच 24 प्रकारचा चहा

उमरखेड शहरात प्रथमच 24 प्रकारचा चहा

287

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.6फेब्रुवारी):-स्वराज्य चाय प्रतिष्ठान
भारतात कष्टकरी,मध्यमवर्गीय आणि सर्वच स्तरातील माणसांची आवडते पेय म्हणजे चहा.

अगदी चहा चे नाव जरी घेतले तरी काही जणांचा थकवा निघून जावा.इतकी लोकप्रियता याच लोकप्रिय चहा ला नव्या 24 प्रकारा सोबतच केशरयुक्त मसाला दूध उमरखेड नगरीतील शहरवासीयांच्या सेवेत घेऊन आलेले आहेत.
संदीप शिंदे पाटील झाडगांवकर.

सर्वसामान्य घरातून येऊन उच्चशिक्षित होऊन, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा ध्यास उरी बाळगत, मेहनत, जिद्द आणि चिकाटी, यांच्यासोबत कल्पकेतीची सांगड घालनारा युवा उद्योजक संदीप शिंदे या 23 वर्षीय तरुणाने ही अनोखी मेजवानी उमरखेड करांच्या सेवेत सुरू केली.

दि.06 फेब्रुवारी रोजी स्वराज्य चाय येथे भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी उद्घाटक चक्रधर पाटील देवसरकर यांनी युवकांनी उद्योग क्षेत्रात उतरून उद्योजकता विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श शिवनीतीचे व्यवस्थापन , यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शून्यातून विश्व निर्माण करण्याचा दृढनिश्चय करावा असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून साहेबरावजी धात्रक साहेब(पत्रकार दैनिक पुण्यनगरी) यांनी शुभेच्छा देत, युवकांनी अश्याच प्रकारे नवनिर्मितीचा ध्यास घेत वाटचाल करावी असे सांगत मंगल कामना व्यक्त केली.

यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे दिगांबरराव कदम पाटिल,राजाराम बापू पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कुमार गावंडे सर,
रुचिरा रेस्टॉरंट चे संचालक गोविंद भोयर,प्रा.गजानन दामोधर सर,इंजी. धनंजय गावंडे,राहुल कांबळे,नारायण लोणकर, भारतीय विद्यार्थी मोर्चा चे तालूकाध्यक्ष भूषण पठाडे, सुहास मुनेश्र्वर, शहराध्यक्ष साहिल रोकडे,राहुल देशमुख,राहुल बनासकर, अक्षय सूर्य,पवन कोरडे,आकाश पवार,राजेश शिंदे, ऋषिकेश देवसरकर,सूर्यकांत वाढवे,शिवाजी चंद्रवंशी यासह विविध सामाजिक संघटना व संस्थांचे पदाधिकारी ‘ अॅड अनंतराव देवसरकर व्यापार संकुलातील व्यापारी बंधू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here