Home महाराष्ट्र नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक वंचित बहुजन आघाडीची प्रचार यंत्रणा सक्रिय

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक वंचित बहुजन आघाडीची प्रचार यंत्रणा सक्रिय

148

✒️वर्धा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वर्धा(दि.25जानेवारी):-महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघ नागपूर विभागाची निवडणूक दिनांक 30 जानेवारीला संपन्न होत आहे, या निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. दीपककुमार खोब्रागडे यांची प्रचारयंत्रणा वर्धा जिल्ह्यात सक्रिय झाली असून जिल्ह्यातून खोब्रागडेना बढत मिळवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या संबंधाने दिनांक 21 जाने. ला स्थानिक धम्मकुटी वाचनालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय घंगारे यांचे अध्यक्षतेखाली, जिल्हा प्रभारी इंजि. बंडूभाऊ नगराळे, उमेदवार प्रा. दीपककुमार खोब्रागडे, डॉ. केशव मेंढे यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा ठक संपन्न झाली. सदर बैठकीत प्रचार साहित्य व
मतदार यादीचे तालुकानिहाय वितरण करण्यात आले. वर्धा जिल्ह्यातून खोब्रागडे याना पहिल्या पसंतीचे किमान दीड हजार मते मिळण्यासाठी रणनीती आखण्यात आली.

त्याच्या अमलबजावणीसाठी शिक्षकी पेशातील अनुभवी लोकांची चमू गठीत करण्यात आली

जुनी पेंशन योजना, शिक्षक भरती, शिक्षकांची पूर्णकालिक नियुक्ती, व्यावसायिक शिक्षण संस्थांतील सर्व प्राध्यापकांना पूर्ण पगार इ. महत्वपूर्ण मुद्यावर केंद्रित झालेल्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कटीबद्धता, उमेदवाराची प्रामाणिकता पटवून देण्यासंबंधी प्रमुख अतिथीनी या बैठकीत मार्गदर्शन केले.

बैठकीला सिद्धार्थ डोईफोडे, प्रा. दीपक फुसाटे, वसंत मुरारकर, संतोष भगत, श्रीपाल कांबळे, मंगला कांबळे सहित विविध तालुका प्रमुख उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here