Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना पुसदच्या अध्यक्षपदी अरुण बरडे तर...

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना पुसदच्या अध्यक्षपदी अरुण बरडे तर सचिवपदी शरद पवार निवड

269

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24जानेवारी):-येथे महाराष्ट्र संगणक परिचालक संघटनेची नुकतीच सभा संपन्न झाली या सभेमध्ये हिवाळी अधिवेशनात झालेल्या मोर्चाबाबत व मुंबई येथे झालेल्या बैठकीबाबत माहिती देण्यात आली. व त्यावर चर्चा करण्यात आली.

पुसद तालुक्यातील महाराष्ट्र संगणक परिचालक कार्यकारणीचे पुनर्गठन करण्यात आले.

तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यांचेसोबत सविस्तर चर्चा करून तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा अरुण बरडे यांची, उपाध्यक्ष पदी सचिन ठाकरे यांची तर सचिव पदी शरद पवार यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच संघटनेच्या इतर पदावर सर्कलप्रमाणे सदस्य निवडण्याचे ठरविण्यात आले.लवकरच संघटनेचे नवीन ऑनलाईन व ऑफलाईन सभासद फॉर्म भरून घेण्यात येणार असून संघटनेची पुढील दिशा व नियोजन ठरविण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर जाधव यांनी तर आभारप्रदर्शन बाळू मस्के यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here