Home महाराष्ट्र भगवान सानप यांच्यावतीनेवरद दराडे चा सत्कार

भगवान सानप यांच्यावतीनेवरद दराडे चा सत्कार

301

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21जानेवारी);-दुबई आणि बँकॉक येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील आशियाई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी With दराडे याची निवड झाल्यामुळे भगवान सानप यांच्या कडुन त्यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

चेन्नई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवड चाचणीसाठी एकूण 32 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये जवळपास 600 खेळाडुंनी आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी चाटे कॉलनी, गंगाखेड येथील रहिवासी असलेला वरद माधवराव दराडे हा केवळ 15 वर्षे वय असलेल्या क्रिकेट खेळाडूची, दुबई आणि बँकॉक येथे पार पडणाऱ्या 17 वर्षाखालील आशियाई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी (विकेट किपर व बॅट्समन)अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

त्याबद्दल वरदचे अभिनंदन करुन त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी केशव नागरगोजे, विष्णू भेंडेकर,गजानन देवकते, देविदास देवकते, बालाजी मुंडे, राम मुंडे,बाळु कराड अशोक मुंडे, माधव दराडे, यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here