Home महाराष्ट्र माहिती अधिकार नागरिक समूहाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन राळेगण मध्ये!

माहिती अधिकार नागरिक समूहाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन राळेगण मध्ये!

244

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

अहमदनगर(दि.18जानेवारी):- रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी हिंद स्वराज ट्रस्ट प्रशिक्षण हॉल राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे माहिती अधिकार नागरिक समूहाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होणार आहे या अधिवेशनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून , मोठ्या प्रमाणात माहिती अधिकार नागरिक महाराष्ट्रातून या अधिवेशनासाठी येणार आहेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अनेक माहितीगार नागरिकांनी यासाठी नाव नोंदणी केली आहे , २५० रू . शुल्क भरून आपल्यालाही नावनोंदणी करता येईल , या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णाजी हजारे
माहिती अधिकार नागरिकांना मार्गदर्शन करणार , माहिती माहिती अधिकार कायदा या देशात लागू करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे मोठे योगदान आहे , कायद्यासाठी त्यांनी अनेकदा उपोषण करून जनतेसाठी माहिती अधिकार कायदा प्राप्त करून दिला आहे .

कायद्याविषयी जनजागृती या विषयावर अण्णा हजारे मौलिक मार्गदर्शन करणार आहेत . त्यांचे विचार ऐकण्यासाठी अनेक माहिती अधिकार नागरिक उत्सुक झाले आहेत , म्हणून अनेकांना राळेगण येथील अधिवेशनाची मोठी ओढ लागली आहे . त्याचप्रमाणे माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश जी गांधी हे सुद्धा माहिती अधिकार नागरिकांना मार्गदर्शन करणारा आहेत . तसेच माजी राज्य माहिती आयुक्त संभाजी सरकुंडे सर हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत आणि ते ही मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत , दुपारच्या सत्रामध्ये संजय पठाडे सर हे मार्गदर्शन करणार आहेत , तसेच माहिती अधिकार कायद्याचे जेष्ठ अभ्यासक माजी प्राचार्य शिवाजी राऊत हे सुद्धा मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.

ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह यांनी हे अधिवेशन आयोजित केले आहे सदर अधिवेशनासाठी अनेक नागरिकांनी आपली नाव नोंदणी ज्ञानमाता सेवाभावी संस्थेकडे केली आहे . माहिती अधिकार कायद्याचा प्रचार प्रसार व्हावा सर्वसामान्य माणसांना कायद्याचे महत्त्व समजावे कायद्याचे सर्व नियम व कायद्याची महत्त्वकांक्षा सर्वांना समजावी या हेतूने ज्ञानमाता सेवाभावी संस्थेने नागरिकांसाठी हे अधिवेशन आयोजित केले आहे ..

ज्ञानमाता सेवाभावी संस्थेद्वारे महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना ऑनलाइन द्वारे माहिती अधिकाराचे प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणासाठी अनेक शासकीय अधिकारी अनेक सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवतात आणि
प्रशिक्षणासाठी अनेक शासकीय अधिकारी अनेक सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवतात आणि प्रशिक्षण घेतात , अनेक कुटुंबातील लहान बालके आणि विद्यार्थी सदर प्रशिक्षण घेण्यास उत्सुक झाले आहेत . या प्रशिक्षणातून अनेक नागरिक कायदा शिकण्याची जिद्द दाखवतात ज्ञानमाता सेवाभावी संस्थेने ऑनलाइन चैनल द्वारे अनेकांना माहिती अधिकाराचे महत्त्व पटवून सांगितले आहे आणि प्रशिक्षण दिले आहे या प्रशिक्षणातून अनेकांना माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व समजले आहे ज्ञानमाता सहभागी संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव यांनी आपल्या कार्यकारिणी शी चर्चा करून अधिवेशनाची तयारी केली , सदर अधिवेशन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व टीम चांगल्या प्रकारे काम करत आहे .

सर्वांना सोबत घेवून पूर्ण महाराष्ट्र मध्ये माहिती अधिकार कायद्याची जनजागृती करायची आहे . माहिती अधिकार नागरिक समूह चे राज्य कार्याध्यक्ष गणेश शिंदे , आणि विठोबा द्यानद्यांन यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली . ज्ञानमाता सेवाभावी संस्था अल्पावधीत आय एस ओ प्रमाणित झाली असून , तसेच संस्था लोगो trademark करण्यात आला आहे . सदर अधिवेशन मध्ये माहिती अधिकार नागरिक समूहाच्या राज्य कार्यकारिणीला नियुक्ती पत्र देण्यात येणार असून , महाराष्ट्रभर माहिती अधिकाराचे काम करण्यासाठी जबाबदारी देण्यात येणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here