Home महाराष्ट्र देशासाठी समर्पीत जिवन जगण्यासाठी आजच्या दिवशी प्रतिज्ञा घ्यावी–व्ही. बी कळकर्णी जिल्हा न्यायाधिश

देशासाठी समर्पीत जिवन जगण्यासाठी आजच्या दिवशी प्रतिज्ञा घ्यावी–व्ही. बी कळकर्णी जिल्हा न्यायाधिश

176

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13जानेवारी):- तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक१२/१/२०२३ रोजी दुपारी २:२० वाजता कोर्ट कॅन्टींग हॉल येथे राष्ट्रीय युवा दिवस राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी पुसद येथील जिल्हा न्यायाधीश वसंत बी कुळकर्णी, हे उपस्थित होते. तसेच दिवाणी न्यायाधीश व्यास व मस्के, तसेच वरपे, कादरी हे न्यायधीश देखील सामील झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे ॲड. अल्पना जैयस्वाल यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम एन.जी. व्यास न्यायधीश यांनी राष्ट्रीय युवा दिन म्हणजे काय व त्याचे महत्व काय याची माहिती दिली.

त्यानंतर ॲड. सौ.श्वेता पांढरीपांडे यांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची महती विषद करीत कवितेचे गायन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व्ही. बी. कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ पुसद यांनी आपल्या भाषणामध्ये भारतामध्ये जास्तीत-जास्त युवक वर्ग आहे व हा युवकांचा देश आहे. व देशाची प्रगती युवकांवरच अवलंबुन आहे म्हणुन त्यांना देशाच्या विकासा संबंधातून योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच १२ जानेवारी स्वामी विवेकानंदाचा जन्मदिवस हा युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो असे सांगितले त्यांनी असेही सांगितले कि, १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. सदर जयंती १९८५ सालापासुन साजरी करण्यात येत आहे. व १२ जानेवारीला युवा दिन म्हणून घोषित केलेले आहे.

त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण जिवन हे अत्यंत तेजस्वी व प्रेरणादायी होते असे सांगितले ते भारतीय युवा साठीच नाही तर जगातील सर्व युवकांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. देशाला प्रगतीच्या मार्गावर युवाच नेवु शकतो व देशाचे भविष्य हे देशाच्या युवकांच्या हाती आहे त्यामुळे देशातील युवांना शिक्षणाच्या नौकरीच्या, राजकारणांच्या विविध संधी उपलब्ध झाल्या पाहीजे तसेच युवा वर्गाच्या प्रगतीसाठी व त्यांना सशक्त करण्यासाठी राष्ट्रीय युवा दिन हा महत्वाचा उपक्रम शासन राबवित असते या दिवशी सर्वत्र जसे शाळा, महाविद्यालये व शासकिय संस्थामध्ये युवा सशक्तीकरणातून निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व युवकांच्या सशक्तीकरणावर देशाची प्रगती कशी अवलंबुन आहे याचे ज्ञान दिल्या जाते.

आजचा युवा हा उदयाच्या देशाच्या भविष्याचा निर्माता आहे. त्यामुळे भारतातील सर्व युवकांनी स्वामी विवकानंदाचा आदर्श ठेवून देशासाठी समर्पीत जिवन जगण्यासाठी आजच्या दिवशी प्रतिज्ञा केली पाहिजे व ती करणे आवश्यक असल्याचे म्हटले आजच्या दिवशी सर्व युवकांनी व्यसनांपासून मुक्त होण्याचा निर्धार करावा व स्वतःचे सशक्तीकरण करावे असे प्रतिपादन केले. प्रत्येक युवकांनी चांगले चरित्र धारण केले पाहीजे. ज्यामुळे देशाची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल असेच कार्य केले तरच जगामध्ये आपला देश प्रगतीमध्ये अग्रेसर राहील असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सुत्रसंचालन ॲड. सौ. अल्पना जैयस्वार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲड. श्वेता पांढरीपांडे, यांनी केले सदरचे कार्यक्रमास मोफत कायदेविषयक मार्गदर्शन करणारे ॲड महेश पाठक, तसेच प्रतिथयश ॲड सौ सुशिलाताई नरवाडे, ॲड. डी.डी. पवार, ॲड अर्जुन राठोड, ॲड इमराण चव्हाण, ॲड. सौ. अंजली नरवाडे, ॲड. सौ.अंबीकाताई जाधव, सौ. ममता सगणे, ॲड. सौ. सुचिता नरवाडे, ॲड. अश्विनी पवार, ॲड. सौ. शामसुंदर, ॲड राजेश शिंदे, वकिल संघ पुसद तसेच अधिक्षक विलाम बंगाले, लिपीक सौ. बेले मॅडम न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार व पत्रकार, तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here