Home महाराष्ट्र संविधानाचे महत्व समजून घेणे काळाची गरज

संविधानाचे महत्व समजून घेणे काळाची गरज

190

🔸स्नेहदिप बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम
____________________________
✒️बळवंत मनवर(विशेष प्रतिनिधी)
_________________________
नागपूर(दि.12डिसेंबर):-येथे लुंबिनी नगर परिसरात सनेहदिप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणी लहान,मोठ्यांना संविधान म्हणजे काय ? त्याची गरज व देशासाठी त्याचे महत्व लोकांना समजावे यासाठी संडे मिशन अंतर्गत ते विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात यावेळी सुद्धा नागपूर येथील लुंबिनी नगर मधे लहान मुलांना संविधानाचे शिक्षण देण्याकरिता तसेच त्यांच्यात महापुरुषांचे विचार रुजावे या करीता चित्रकला तसेच प्रश्नमंजुषा या विषयावर स्पर्धा ठेवण्यात आली होती.

लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छ्त्रपती शिवाजी महाराज ,तथागत गौतम बुद्ध,भारतीय संविधान,चवदार तळे इत्यादी उत्कृष्ट चित्र काढली व नंतर त्यांना संविधान विषयी प्रश्न विचारण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष अमित भुरे सर होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून बी.एस.एफ.ग्रुप.अध्यक्ष भूषण सरदार हे होते.

यावेळी लहान मुलांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुस्तकं ,पेन,मेडल वाटण्यात आले.यावेळी स्नेहदीप बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तुषार सहारे,अमित भुरे, प्रशिक वानखडे,राखी बोरकर,अंकित उके इत्यादी अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here