


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.30नोव्हेंबर)::- संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गंगाखेड महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी संतोष गायकवाड यांची आज नियुक्ती करण्यात आली.संत जनाबाई महाविद्याल्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा प्राचार्य आत्माराम टेंगशे,सचिव अॅड संतोष मुंडे, सहसचिव दशरथ चौधरी, कोषाध्यक्ष अॅड सुर्यकांत चौधरी, जेष्ठ सदस्य गोपालदास तापडिया,पाठक महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एम.धुत यांच्या वतीने त्यांना आज पदभार देण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य चंद्रकांत सातपुते , सचिन खोकले, डॉ संजीव क्षीरसागर, भारत हातिअंबीरे, भगवान भोसले हे उपस्थित होते निवड झाल्यामुळे सर्व महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ प्राध्यापक मंडळी कर्मचारी यांनी निवड झाल्याबद्दल उपप्राचार्य संतोष गायकवाड यांचा पुष्पहार देऊन अभिनंदन केले.पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.













