Home Breaking News धारासूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

धारासूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

190

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.तालुक्यातील मौ. धारासूर येथे ०२ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सौ. रेखाताई रत्नाकरजी गुट्टे या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. प्रतापरावजी कदम यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थित म्हणून श्री. सुरेश दादा बनगर, निवृत्तीदादा कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रविण खर्जे, पंचायत समिती सदस्य गजानन माने, नगरसेवक उद्धव शिंदे, धारासूर ग्रामपंचायतचे श्री. सरपंच राजेभाऊ गवळे, उपसरपंच अ‍ॅड. सौ. हर्षलाताई कदम, सौ. शिवकन्याताई शिंदे, हरिश्चंद्र कुंडगीर, लक्ष्मणराव कदम, सुधर्म जाधव, श्रीमती. गवळणबाई ढेबरे, सौ. पुस्पाताई नेमाने आदीची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, लोक कल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला. दरम्यान कार्यक्रमा निमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय मल्हार मित्र मंडळ व पदाधिका ऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here