


✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.२९एप्रिल):-जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि., राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन आज दि.२९ एप्रिल ला करण्यात आले होते. नेस्ले सामाजिक उपक्रमांतर्गत झालेल्या या शिबीरात १३५ रूग्णांनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी, हर्षा नन्नवरे, तेजस पाटील, सुनिता सिसोदिया, सागर मसाने, म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशांत चौधरी उपस्थितीत होते.
शिबिरात बी.पी, शुगर, ईसीजी तसेच इतर आवश्यक तपासण्या करून औषध वाटप करण्यात आल्या. डॉक्टरांनी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सल्ल्याबरोबरच जीवनशैलीत बदल, आहार व व्यसनमुक्ती याबाबतही मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच वैजंताबाई शिरसाठ, प्रदिपसिंग पाटील, संजू प्रकाश लंगरे, समाधान धनगर, पृथ्वीराज पाटील, दिपक जाधव, दिपक चांभार, आशितोष माळी, रविंद्र धनगर उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी पाथरी ग्रामपंचायत व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, प्रशांत सुर्यवंशी, विक्रम अस्वार, अर्जून प्रसाद, सुशिल कदम, मुरलीधर नेटके यांनी परिश्रम घेतले..
शिबिराला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिलांनी व वृद्ध नागरिकांनी मोठ्या संख्येने तपासणी करून घेतली. अनेक रुग्णांनी गावातच डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन मिळाल्यामुळे वेळ व खर्च वाचत असल्याची प्रतिक्रीया दिली.














