


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.29एप्रिल):-तालुक्यातील गोदावरी पत्रातून दिवसराञ सुरू असलेला अवैध वाळू उपसा वाहतूक पाहता महसूल प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नदीपात्रात जेसीबी, पोकलेन लोडरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातोय. तसेच हायवा, टिप्पर, ट्रॅक्टर आणि छोट्या ब्रास गाड्यांमधून वाळूची खुलेआम वाहतूक केली जाते हा सगळा प्रकार खुलेआम सुरू आसून, महसुल अधिकाऱ्यांचा तर यांना आशीर्वाद दिला आहे का?.अशी चर्चा गावकारी करताना दिसते. गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाने परिस्थिती गंभीर झाली असून . दिवसराञ जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा होतोय आणि हायवा टिप्परमधून खुलेआम वाहतूक सुरू आहे. महसूल प्रशासनाच्या निष्क्रियते चा कळस दिसून येतो. गोदावरीचे पात्र खोदून वाळू काढल्याने पर्यावरणीय समतोल बिघडत असून शेती,भूजलावर, परिणाम होत आहे. दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा काडला जात आहे.
गंगाखेड तालुक्यात गोदावरी पाञात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मर्यादित व नियमानुसार वाळू उपशाला परवानगी देण्यात आली असली, तरी महातपुरी धारखेड-भांबरवाडी परिसरातील वाळू धक्क्यावर ठरवून दिलेल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे धारखेड भांबरवाडी पाञात तर अनेक पाणबुडी बोटी यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. नियमांनुसार मजूर व टोपल्यांच्या सहाय्याने वाळू काढण्याची अट असतानाही, प्रत्यक्षात जेसीबीसारख्या यंत्रांचा पाणबुडी बोटीचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे एकाच पावतीवर अनेक ट्रिप्स करून शासनाच्या महसुलाला तडा दिला जात आसताना गंगाखेड महसुल प्रशासन गप्प आहे.
गोदावरी पाञात रात्री-दिवस सुरू असलेल्या या उपशामुळे नदीपात्राची अक्षरशः चाळणी झाली असून पर्यावरणीय समतोल पूर्णपणे बिघडला आहे बेसुमार वाळू उपसा दरम्यान, मोठ्या हायवा ट्रकद्वारे वाळूची वाहतूक जनाबाई मंदिर व अन्य मंदिरा समोरून होत आसल्याने सर्वत्र धुळीचे लोट पसरत आहेत वाळूचे हायवा शहराच्या मुख्य बाजार पेठेतून जात असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे वाळू उपशाने भूजल पातळी झपाट्याने कमी झाल्याने याचे उन्हाळ्यात परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत असून परिसरातील विहिरी व बोअरवेल्स कोरड्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महातपुरी धारखेड भांबरवाडी वाळू धक्क्यावर सुरू असलेला नियमबाह्य वाळू उपसा तात्काळ बंद करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी व पर्यावरणाचे रक्षण करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.














