Home महाराष्ट्र व्हॉइस ऑफ मीडियाचा पदग्रहण सोहळा व पत्रकार कार्यशाळा संपन्न

व्हॉइस ऑफ मीडियाचा पदग्रहण सोहळा व पत्रकार कार्यशाळा संपन्न

121

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.29एप्रिल):- व्हॉइस ऑफ मीडिया भंडारा जिल्हा यांच्या वतीने जिल्हा व तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा तसेच पत्रकार कार्यशाळेचे आयोजन बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजता साई प्लाझा हॉटेल, भंडारा येथे उत्साहात पार पडले.

या सोहळ्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय समन्वयक तथा संचालक किशोर करंजेकर, राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख, वर्धा जिल्हाध्यक्ष निलेश पिंजेकर, भंडारा जिल्हाध्यक्ष शशीकांत भोयर, काशिनाथ ढोमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांनी केले तर संचालन व आभारप्रदर्शन रवी भोंगाणे यांनी केले.

‘न्यायासाठी संघटन शक्तीची आवश्यकता – निलेश पिंजेकर  

वर्धा जिल्हाध्यक्ष निलेश पिंजेकर म्हणाले, “कोरोना काळात अनेक पत्रकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्याच काळात संदीप काळे सरांनी एका पत्रकार मित्राला मदत करताना विचार केला की, पत्रकारांसाठी संघटना हवी. बुलढाण्यातील छोट्याशा गावातून व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्म झाला आणि आज जगातील 73 देशांत ही संघटना कार्यरत आहे. न्यायासाठी संघटन शक्तीची आवश्यकता आहे. पत्रकार निर्भिड असावा.”

‘लढाई प्रशासकीय अधिकाऱ्यांशी’ – नरेंद्र देशमुख  

राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख म्हणाले, “आपली लढाई प्रशासकीय अधिकाऱ्यांशी आहे. त्यामुळे कार्यक्रमाला अधिकाऱ्यांना निमंत्रित करावे. पत्रकारांनी एकजूट दाखवावी.”

‘पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन’ – किशोर करंजेकर 

राष्ट्रीय समन्वयक किशोर कारंजेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “पत्रकारांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले आहे. पत्रकारांच्या भविष्यासाठी संघटना सतत कार्यरत राहील.” हिवराज उके व अनिल कारेमोरे यांनीही पत्रकारांच्या भविष्याबत मार्गदर्शन केले.

‘निर्भिडपणे चुका मांडा’ – अतिरिक्त एसपी निलेश मोरे  

पदग्रहण समारंभात बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे म्हणाले, “2002 पासून पोलीस खात्यात काम करत असताना अनेक जिल्ह्यांतील पत्रकार बांधवांचे फोन येतात. चुकीचे काम निदर्शनास आणून दिल्यास त्यावर कारवाई होते. चांगल्या कामाची दखल घेऊन सत्कारही केला जातो. पत्रकारांनी निर्भिडपणे चुका आमच्यापर्यंत मांडाव्यात. समाजाच्या विकासासाठी प्रशासन व पत्रकारांनी एकत्र काम केले पाहिजे. लोकशाहीची मूल्ये व संविधानिक तत्त्वांचे पालन करताना पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे आहे.” असे संबोधन त्यांनी केले.

सदर वेळी पदग्रहण करण्याकरिता संविधानाच्या ग्रंथाला साक्षी ठेवून पत्रकारांच्या शपथ चे वाचन अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी पत्रकारांना शपथ दिली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार हिवराज उके, अनिल कारेमोरे, मनोज चिचघरे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. बदलत्या काळातील पत्रकारितेची आव्हाने, डिजिटल मीडियाचा प्रभाव व पत्रकारांचे हक्क-जबाबदाऱ्या या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्ह्यातील प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी साकोली तालुका अध्यक्ष आशिष चेगडे, लाखनी तालुका अध्यक्ष कल्याण राऊत, पवनी तालुकाध्यक्ष चरणदास बावणे, तुमसर तालुकाध्यक्ष अनिल कारेमोरे, भंडारा शहर प्रमुख काशिनाथ ढोमणे यांच्यासह जिल्हा कार्यकारणीत विशाल रणदिवे, अनमोल मेश्राम, हंसराज रामटेके, देवचंद टेंबरे, कालिदास खोब्रागडे, अनिल शेंडे, प्रकाश हातेल, डी जी रंगारी, किशोर गडकरी, मनोज चिचघरे यांची सर्वानुमते जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

        सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राकेश श्यामकुवर, अनमोल मेश्राम, हंसराज रामटेके, उमेश जांगडे, सुशील चौधरी, मुकेशकुमार मेश्राम, विलास केजरकर, समीर नवाज, रोशन मदनकर आदींनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here