Home महाराष्ट्र सद् गुरू नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

सद् गुरू नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी 

78

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27एप्रिल):-शहरातील सद् गुरू नगर या ठिकाणी लुंबीनी बौद्ध =विहाराच्या नियोजित जागेवर दिनांक 27 एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 135 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मिरवणुकीचे आयोजन न करता सकाळच्या सत्रामध्ये महामानवांच्या विचारधारेवर प्रकाशमान टाकत बुद्ध वंदना, मान्यवरांचे भाषण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सत्यपाल साळवे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पंडित पारवे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष आर, जी. मस्के ,नरवाडे सर ,गुणवंत कांबळे,गोविंद साळवे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोडे ,रेल्वे स्टेशन अधीक्षक राहुल डोंबे, शाहीर भगवान गायकवाड ,श्रावण गायकवाड, गोरखनाथ कांबळे, बौध्दाचार्य रमेश जोंधळे,नाना लांडगे, शंकर मस्के, रणजित शिंदे,लहुराज केदारे उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या हस्ते पंचशील व निळया ध्वजाचे ध्वजारोहण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाशमान टाकण्यात आला उपस्थित सर्व नागरिकांना भोजनदान देण्यात आले .

रामदास खंदारे, रमेश हनवते, रमेश वाघमारे ,नारायण कांबळे ,राहुल साळवे, वैभव हनवते, बळीराम कदम, गणेश कांबळे, प्रभू कांबळे, वसंत गायकवाड, जगन कांबळे, गोविंद चव्हाण ,दस्तगीर शेख ,ओमकार उफाडे, लखन जाधव ,प्रभाकर साळवे, सोपान साळवे ,शंकर मस्के, मुकेश साबणे, मारुती साबणे ,मुंजा साबणे, कैलास खरात ,नारायण खरात ,संजय नरहिरे,वैभव नारायणकर, सुभाष नारायणकर ,दत्ता नारायणकर यांनी या जयंतीसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here