Home महाराष्ट्र दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद‌यालयात ‘मशरूम लागवड प्रशिक्षण ‘संपन्न

दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद‌यालयात ‘मशरूम लागवड प्रशिक्षण ‘संपन्न

33

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.27एप्रिल):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महावि‌द्यालयातील वनस्पतीशास्त्र व जीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने Training on Mushroom Cultivation (मशरूम लागवड प्रशिक्षण) या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

       या प्रशिक्षणाकरिता महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर सचिव मा. ताइसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी प्रोत्साहीत करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करिता शुभेच्छा व्यक्त केल्या.

        या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या एम. सोनवणे यांनी उद्‌घाटक व अध्यक्षस्थान भूषविले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक तसेच लोणी पंचक तालुका चोपडा येथील देवकेश मशरूम फार्म संचालक डॉ. अनिल माळी तसेच महाविद्‌यालयाचे उपप्राचार्य व वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.आर. एम. बागुल, कनिष्ठ महावि‌द्यालयाचे पर्यवेक्षक ए. एन. बोरसे उपस्थित होते.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागूल यांनी केले. यावेळी त्यांनी मशरूमचे जागतिक पातळीवरील वितरण व महत्व स्पष्ट केले. तसेच मशरूमची लागवड कशी करावी, त्यासाठी लागणारे साहित्य, कमीत कमी खर्चात कसे उपलब्ध करता येईल याबद्‌दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी मशरूम लागवड करत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय योजना याबद्दल सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यांच्या पॉवर पॉइंट सादरीकरणामध्ये मशरूमचे आहारातील महत्व, त्याचे औषधी गुणधर्म, मशरूम बद्‌दल समाजातील समज आणि गैरसमज इत्यादी विषयावर शास्त्रीय पद्धतीने महत्वपूर्ण विश्लेषण केले.

       या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या एम. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण व दैनदिन जीवनातील प्रथिनांचे महत्व उदाहरणासह पटवून दिले. तसेच महाविद्यालयाच्या आर्थिक दुर्बल व इतर घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना याचा आर्थिक स्वरुपात फायदा कसा करून घेता येईल याबद्‌दल व कौशल्य निर्मितीसह मार्गदर्शन केले. 

     या प्रशिक्षणासाठी महाविदयालयातील ७० विद्यार्थ्यासह वनस्पतीशास्त्र विभागातील एम. एस्सी.भाग-१ व संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.

     या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जे. जी. पाटील यांनी केले तर आभार आर. एस. निकम यांनी मानले.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून आर. ई. लांडगे व डॉ. पी. एन. सौदागर यांनी काम पाहिले.

    या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. डी.ए. तायडे, सौ. संगीता पाटील, सौ.पुष्पा दाभाडे, सौ.कीर्ती मोरे, सिरीन सैय्यद, सौ.दिपाली पाटील, सौ. आरती बोरसे, एस. जे. ठाकरे, एस. बी. पवार, एस.पी. सोनवणे, एस.एस. पारडे, श्रीमती विशाखा व्ही. देसले, संशोधक विद्यार्थी रमनलाल पाटील व रवींद्र व्ही. पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here