Home महाराष्ट्र चोपडा येथील ​दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाला शैक्षणिक अंकेक्षण मूल्यांकनात ‘अ+’ दर्जा

चोपडा येथील ​दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाला शैक्षणिक अंकेक्षण मूल्यांकनात ‘अ+’ दर्जा

37

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

​चोपडा(दि.26एप्रिल):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत असलेल्या महाविद्यालये आणि परिसंस्थांचे दर तीन वर्षांनी शैक्षणिक अंकेक्षण अर्थात अकॅडेमिक ऑडिट केले जाते. या अकॅडेमिक ऑडिटमध्ये दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयाला ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे.

​विद्यापीठ कायदा २०१६ नुसार प्रत्येक महाविद्यालयाचे विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शैक्षणिक निकषाप्रमाणे महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनात चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न, संशोधन क्षेत्र, विविध उपक्रमांतून आलेले अनुदान, आर्थिक नियमितता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या अगोदर चोपडा महाविद्यालयाला विद्यापीठाच्या वतीने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा दर्जाही देण्यात आला होता. एकूणच महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन २०२२-२३ ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शैक्षणिक अहवालात ‘अ+’ श्रेणी जाहीर केली आहे.

     ​महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाची ही बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ व अंतर्गत गुणवत्ता विभाग समन्वयक डॉ. एल. बी. पटले, रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here