Home महाराष्ट्र आकाश विद्यालय मेंढाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी पाणवठे

आकाश विद्यालय मेंढाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले पक्ष्यांसाठी पाणवठे

50

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

  नागभीड(दि.26एप्रिल):- उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असलेल्या पक्ष्यांना मोठा आधार विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापिका कु. गोहने मॅडम यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना बरोबर घेत कलात्मक पाणवटे विद्यालयाच्या परिसरात विद्यालयाच्या परिसरात लावण्याकरिता पाणवटे बनविली. 

वातावरणात बदल होत असून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याचे दिसून येत आहे. या काळात पक्षांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. अन्न पाण्याअभावी पक्षांना प्राण गमवावे लागू नये. यासाठी प्राचार्य कु.गोहने मॅडम यांनी पक्षांसाठी अन्न पाण्याची सोय करता येईल का असा विचार केला. विद्यार्थ्यांच्या मनात पक्षांविषयी संवेदनशीलता व पर्यावरण विषयी आपुलकीची भावना तयार केली. त्यातून विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत. पक्षांच्या अन्नपाण्याची सोय केली आहे.विद्यार्थ्यांकडून उन्हाळ्यात पक्ष्यांची तहान आणि भूक भागवण्यासाठी अभिनव उपक्रम आकाश विद्यालयामध्ये राबवण्यात आले.*कडाक्याच्या उन्हामुळे पक्ष्यांची होणारी भटकंती रोखण्यासाठी विद्यारर्थ्यांनी घरटी आणि पाणवठे तयार करत हा 

पर्यावरण साखळीत पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आकाश विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले पाणवठे पक्ष्यांना बसता येईल झाडावर लटकवता येतील अशा पद्धतीने हे पाणवठे तयार केले. विद्यार्थ्यांकडून पाणवठे तयार करून घेतले. प्राचार्य मुख्याध्यापिका कु.गोहने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते.उन्हाळ्याच्या त्रासापासून पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणात रंजकता आणण्यासाठी नेहमी आकाश विद्यालय मेंढा येथे अनेक अनोखे उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारिक आणि सृजनात्मक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here