Home महाराष्ट्र कवी त्र्यंबक सपकाळे यांचा काव्यमय विद्रोह देशाबाहेरही पोहचला आहे-जयसिंग वाघ 

कवी त्र्यंबक सपकाळे यांचा काव्यमय विद्रोह देशाबाहेरही पोहचला आहे-जयसिंग वाघ 

36

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.24एप्रिल):- ख्यातनाम विद्रोही कवी तथा शासनाचा ‘कवी केशव सुत पुरस्कार’ प्राप्त त्र्यंबक सपकाळे यांच्या काव्यमय विद्रोहाने साहित्याच्या क्षेत्रात सत्तरच्या दशकात मोठी खळबळ निर्माण केली होती. त्यांचा सुरुंग काव्यसंग्रह त्याकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला होता, काही दैनिकात त्यावर अग्रलेख छापले गेले, काही विद्यापीठांमध्ये तो अभ्यासक्रमाला लागला, त्यातील काही कविता आजही अभ्यासक्रमाला आहेत, त्यांच्या कविता अमेरिका, जर्मन मध्ये सुद्धा अनुवादित झाल्या अशी माहिती प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात दिली.

                                         कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या ९६ व्या जयंती निम्मित २२ एप्रिल रोजी अजिंठा हाउसिंग सोसायटी, जळगाव येथे आयोजित समारंभात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना ते बोलत होते.

     जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रभावित होऊन लिखाण करणाऱ्या पहिल्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये त्र्यंबक सपकाळे यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या काव्यसंग्रहावर आतापर्यंत ३ अभ्यासकांनी एम.फिल.तर एकाने पी.एच. डी. पदवी मिळविली आहे. त्यांच्या ‘ सुरुंग’ व ‘ ब्रोकन मेन ‘ या दोन्ही काव्यासंग्रहाचे हिंदी भाषेत काही साहित्यिकांनी हिंदीत अनुवाद केलेला आहे . 

     त्र्यंबक सपकाळे यांचा मुलगा कवी दिलिप सपकाळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजना विषयी सविस्तर माहिती देऊन काही कविता ऐकवल्या व लवकरच त्र्यंबक सपकाळे यांच्या नावाने साहित्य समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल असे सांगितले.

     ॲड. आनंद कोचुरे यांनी ‘ ख्यातनाम विद्रोही कवी त्र्यंबक सपकाळे स्मारक ‘ उभारण्याची संकल्पना बोलून दाखविली .

   इंजी. ममता सपकाळे यांनी त्र्यंबक सपकाळे यांनी कवी त्र्यंबक सपकाळे यांचा जीवनपट मांडून ते किती कष्टाचे जीवन जगले याची माहिती दिली . 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नथु अहिरे , प्रास्ताविक एस. एस. पवार , स्वागत विजय भालेराव यांनी तर आभारप्रदर्शन अशोक सैंदाणे यांनी केले .

  कार्यक्रमाच्या सुरवातीस भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कवी त्र्यंबक सपकाळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रीसरण , पंचशील ग्रहण करण्यात आले.

  कार्यक्रमास नितीन वाघ , सतीश सोनवणे , अरुण सोनवणे , राजेंद्र सपकाळे, रामकृष्ण साबळे , सुमन बैसाणे, प्रियंका सपकाळे , कल्पना नन्नवरे , गीता सोनवणे , सीमा सैंदाणे, कविता सपकाळे , सुनीता बैसाणे, सविता उबाळे , आशा सपकाळे , जमुनाबाई साबळे आदींसह बहूसंख्य कार्यकर्ते हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here