


▪️भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व राष्ट्रसंताची ‘ग्रामजयंती’ साजरी
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.17एप्रिल):- श्री गुरुदेव सेवा मंडळ देवाडा चे वतिने राममंदीरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 135 वी जयंती व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ग्रामजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रचारक ॲड. राजेंद्र जेनेकर होते, उदघाटन माजी पं. स.सदस्य अब्दुल जमीर अब्दूल हमीद यांनी केले,प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शंकर मडावी, पोलीस पाटील अजय शेंडे, प्रमुख वक्ते दिलिपराव ताकसांडे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष तालीवार,सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बोंकूर, नगरसेवाधिकारी बळीराम बोबडे, प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे, सुमठाण्याचे भिवसन बोरुले, नानाजी करमनकर, ईसापूरचे सचिव शिवाजी कष्ठी, अरुण कष्ठी, फाऊंडेशनचे प्रफुल विधाते आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उदघाटन राम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पुजन व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना अभिवादन करुन करण्यात आले, तालुका प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे, सरपंच शंकर मडावी यांनी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्याचे महत्व पटवून सांगीतले. उदघाटक अब्दुल जमीर अब्दूल हमीद यांनी सर्वधर्म समभावाकरीता श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे योगदान महत्वाचे आहे असे विचार व्यक्त केले, प्रमुख वक्ते दिलिपराव ताकसांडे यांनी महापुरुषांचे जीवनकार्य व समान्नोतीकरीता योगदान महत्वाचे आहे याकरीता भारतीय संविधानाचे महत्व पटवून सांगीतले, प्रफुल विधाते यांनी अंबुजा फाऊंडेशन चे माध्यमातून शेती विकासाकरीता योजनाची माहीती दिली, कार्यक्रमाध्यक्ष ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्य व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रा.पं.अधिकारी दिलीपराव ताकसांडे,अब्दूल जमीर अब्दूल हमीद, सरपंच शंकर मडावी, पो.पा.अजय शेंडे, सुभाष तेलीवार, अंबुजा फाऊंडेशन चे प्रफुल विधाते, सोनाली दुबे, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार बोंकूर आदींचा सन्मान करण्यात आला तसेच नव्याने राजुरा तालुका प्रचारप्रमुखपदी पांडुरंग शेंडे व प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना “राष्ट्रसंत साहित्य व पुष्पगुच्छ” देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीकरीता ग्रा.पं.सदस्य प्रतिमा मेश्राम, सचिव लक्ष्मण चौधरी, भजनप्रमुख पत्रुजी शेंडे,रविंद्र गुरनुले, आशावर्कर सुनंदा तिवारी, सुधाकर चौधरी,केशव चोले, राममंदिरचे अध्यक्ष भगवान हरणधरे, पोपय्या जेल्लावार,अनुराग शेंडे आदींनी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचालन पांडुरंग शेंडे यांनी तर आभार शिवा बोंकूर यांनी मानले.














