Home महाराष्ट्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद कार्यकारिणी गठीत 

राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद कार्यकारिणी गठीत 

270

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.10एप्रिल):-राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. नरेंद्र उंदिरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. 

परिषदेच्या वरिष्ठ स्तरावरील निर्णयानुसार तालुका अध्यक्ष पदी प्रा. अजय कऱ्हाडे यांची निवड़ करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली.असून, अनुसूचित जाती-जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी ते विविध स्तरावर सक्रिय राहणार आहेत. प्रामुख्याने महाराष्ट्रातील SC/ST समाजातील उद्योजकता विकास, सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त कार्यकारिणीने यावेळी सांगितले.

या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण मांगरिया, केंद्रीय मंत्री ज्युएल उराव, माजी केंद्रीय मंत्री फगन सिंह कुलस्ते, माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, राष्ट्रीय संघटन प्रभारी पी. सी. बेरवाल, राष्ट्रीय महासचिव डॉ. देवराव होळी, राज्य अध्यक्ष रवी सोमकुवर, प्रदेश सचिव डॉ. नरेंद्र उंदिरवाडे, महिला मोर्चा राज्य महामंत्री अॅड. कविता मोहरकर, गड़चिरोली जिल्हा सचिव मृन्मय उंदिरवाडे, गड़चिरोली जिल्हा उपाध्यक्ष श्री अमोल कुलमेथे , कार्यकारी सदस्य सुशांत राऊत यांना देण्यात आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील या नव्या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या प्रसंगी तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सभेला उपस्थित सभासद प्रा. अजय कऱ्हाडे ब्रम्हपुरी,अमरदिप लोखंडे,माटे सर निवृत शिक्षक,स्वप्नील शेंडे,शैला शिहगड़े,चांदणी ढवळे,विजय नाकतोडे,कुणाली नैताम,अजय डोंगरे सहा. शिक्षक प्रा. रेखा मेश्राम, ने. भैया हि.महाविद्यालय ब्रम्हपुरी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here