Home महाराष्ट्र पेट्रोल डिझेल ब्लॅक मार्केटिंगवर होणार मोठी कारवाई 

पेट्रोल डिझेल ब्लॅक मार्केटिंगवर होणार मोठी कारवाई 

327

✒️रोशन मदनकर l(उप संपादक )

भंडारा(दि.26मार्च):-पेट्रोल टंचाईची अफवा पसरल्याने जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची दोन दिवसापासून गर्दी बघायला मिळत आहे. प्रशासनाने इंधन टंचाईची बातमी फेटाळली असून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. पेट्रोलपंपावर नागरिकांकडून रांगा लावण्यात आल्या आहे. एकाला पेट्रोल भरण्यासाठी एक – दीड तासाचा वेळ लागत आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून खरेदी न करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यात कुठलीही पॅनिक स्थिती नाही. घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करण्याची गरज नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सध्या पेट्रोल, डिझेल पुरवठा नियमित सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. इंधनाचा अनावश्यक साठा करून ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

————————————–

पेट्रोल साठा डेपोमध्ये मुबलक आहे. लोकांच्या अफवेमुळे गर्दी झालेली आहे. जिथे चार हजारचा पेट्रोल लागत आहे, तिथे दहा हजारचा पेट्रोल घेऊन जात असल्याने थोड्यावेळेसाठी पेट्रोल साठा संपतो परंतु वरून येणं सुरु आहे. कसल्याही प्रकारची पेट्रोल ब्लॅक मार्केटिंग लक्ष्यात आल्यास त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल.

 – नरेश वंजारी, अन्न पुरवठा विभाग अधिकारी, भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here