Home महाराष्ट्र अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशी बाबत रविकांत तुर्पे यांची खंत

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशी बाबत रविकांत तुर्पे यांची खंत

150

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

अजितदादांनी पितृतुल्य असलेल्या पवार साहेबांची साथ सोडली. कारण काय तर माझ्या आमदारांना निधी मिळावा, त्यांच्या मतदारसंघाचा विकास व्हावा.

परंतु आज अजितदादा आपल्यात नाहीत. त्यांचा अपघात होता की घातपात, याची चौकशी नीट होत नाही. अतिशय कूर्मगतीने चौकशी सुरू आहे.

असं असताना एकही आमदार दादांसाठी पुढे येताना दिसत नाही. अजितदादांच्या चौकशीबद्दल कोणी बोलताना दिसत नाही. त्यांना नक्की कुणाचा दबाव आहे? निधी आणि सत्ता त्यांना एवढी महत्त्वाची झाली आहे का?

विधीमंडळातील १०० पेक्षा जास्त आमदारांना अजितदादांनी राजकारणात येण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केली आहे. परंतु यातले कुणीच काही बोलत नाही.

आज रोहितदादांनी विधानसभेत याबद्दल खेद व्यक्त केला. एक पुतण्या- दादांच्या बोटाला धरून राजकारणात आलेल्या रोहितदादांना नक्कीच याचं वाईट वाटत असेल की दादांच्या पुढे-मागे फिरणारे हे आमदार, दादांच्या मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळण्यासाठी एक चकार शब्दही काढत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here