Home धार्मिक  श्रीराम नवमी निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

श्रीराम नवमी निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन

119

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

मुंबई(दि.26मार्च):-गुरुवार रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती व समस्त हिंदू बांधव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. या वर्षीच्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये दिनांक 23 व 24 मार्च रोजी गंगाखेड शहरातील जवळपास 20 विद्यालयांमध्ये पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते विजय खुटवड (श्री संत सेवा संघ पुणे) यांचे 

‘ *पुरुषोत्तम श्रीराम* ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले .तर दिनांक 26 मार्च रोजी प्रभू श्रीरामांची चांदीच्या रथामधून भव्य मिरवणूक सायंकाळी चार वाजता निघणार आहे. या मिरवणुकी तील सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत पुणे येथील ढोल पथक, पारंपारिक संबळ वादक, वारकरी भजनी मंडळाचे पथक, राम, लक्ष्मण व सीता यांचा सजीव देखावा करण्यात येणार आहे.

मिरवणुकीच्या नंतर प्रभू श्रीरामाची आरती व महाप्रसाद असे एकंदरीत या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन असणार आहे. मिरवणुकीचा मार्ग गोदाकाठ येथून सुरुवात होऊन भगवती चौक, श्रीराम चौक मार्गे, अहिल्याबाई होळकर चौक व शिवस्मारक येथे श्रीराम पूजन होऊन त्या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप होईल. तरी पंचक्रोशीतील समस्त माता, भगिनी, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी बांधव व सर्व हिंदू बांधवांनी या भव्य मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती गंगाखेड तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here