Home महाराष्ट्र झाडीपट्टीतील मराठी रंगभूमीतील उगवता तारा,उत्कृष्ट गायक ते उत्तम कलावंत शुभम मसराम यांच्या...

झाडीपट्टीतील मराठी रंगभूमीतील उगवता तारा,उत्कृष्ट गायक ते उत्तम कलावंत शुभम मसराम यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावला!

144

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.25मार्च:-कष्टाची तयारी आणि कलेचे जिद्द असलेले, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश कसे मिळवता येत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नागभीड तालुक्यातील तळोदी येथील शुभम भाऊ मसराम.

 कधीकधी वडिलांसोबत नाटकाच्या तालमीला जायचा नाटकाचे सादरीकरण कसे करतात हे बघायचे. नाटकातील गायक कसे गातात हे बघून शुभम मसराम यांनी ठरवलं आपण सुद्धा झाडीपट्टीतील नाटकांमध्ये गायचे एक मनामध्ये जिद्द निर्माण झाली.

 आज हा तरुण आपल्या अस्सल अभिनयाने व गायक संपूर्ण महाराष्ट्राला व विदर्भाला आपल्या गाण्याने वेड लावले आहे.

 शुभम भाऊ मसराम गायक ते उत्तम कलावंत यांच्या अभिनयातील जादू इतकी जबरदस्त आहे की. आजच्या गावात त्यांचे नाटक असते तिथे त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी चहा त्याची तुफान गर्दी उसळते.

 विशेष म्हणजे झाडीपट्टीतील चॉकलेट बाय या नावाने सर्वत्र परिचित आहेत प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे.

 झाडीपट्टी मराठी रंगभूमी च्या 

 नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 शुभम मसराम यांच्या उत्तम गायक व अभिनयाने झाडीपट्टी रंगभूमी आतापर्यंत तब्बल

108 च्या आसपास यशस्वी प्रयोग पूर्ण केले असून प्रत्येक प्रयोग हाउसफुल होत आहे.

 आपल्या कलेच्या जोरावर शुभम मसराम यांनी केवळ ग्रामीण भागात नव्हे तर राज्यस्तरावरील आपली ओळख निर्माण केली आहे.

 त्यांच्या याच असामान्य कामगिरीची दखल घेत नुकताच

{ विश्व मराठी संमेलन कालिदास

 नाट्यगृह नाशिक येथे प्रयोग सादरीकरण संधी. 

 अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या वतीने उत्कृष्ट कलावंत म्हणून सम्मानित करण्यात आले.}

 या सन्मानाने त्यांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

( संघर्षाची एक प्रेरणादायी गाथा ) : वडिलांसोबत नाट्यप्रयोग बघायला जाणारा हा कलाकार आज विदर्भाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यात पाहता, त्यांचे करियर आता यशाच्या शिखरावर असल्याचे दिसते.

 शुभम मसराम यांनी स्वतः लिहिलेलं गाणं येत्या 1 एप्रिल ला ” मला येड लागलं “हे गाणं युट्युब वरती सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here