Home चंद्रपूर सामाजिक जाणीव जागृतीमुळे समाज सुजाण व प्रगत बनतो – ओंकार ठाकरे 

सामाजिक जाणीव जागृतीमुळे समाज सुजाण व प्रगत बनतो – ओंकार ठाकरे 

80

▪️शास. औ. प्र. संस्थेच्या रासेयोच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24मार्च):- ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संस्थेच्या परिसरात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर होते. नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, असिस्टंट परिवहन अधिकारी निखिल गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार बंडोपंत बोढेकर, कार्यक्रम अधिकारी आर.पी. श्रीरामे, उपकार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, गटनिदेशक जितेंद्र टोंगे, हितेश नंदेश्वर, श्री. शाहु,‌ कार्यालय अधीक्षक श्री. कंगाले आदींची उपस्थिती होती.

        शिबिराच्या उपक्रमाबाबत गटनिदेशक आर. पी. श्रीरामे यांनी आढावा घेतला तर बंडोपंत बोढेकर यांनी रासेयोचे कार्य आणि कौशल्य विकास यातील अनुबंध यावर विचार मांडले. यावेळी ओंकार ठाकरे म्हणाले की, श्रमसंस्कार शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृती होत असते .नवयुवकांत सामाजिक जाणीव जागृती झाल्यास आपला समाज अधिक सुजाण आणि प्रगत बनतो. त्यामुळे असे श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थी जीवनात गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

   रासेयो शिबिरामुळे संस्थेतील विविध उपक्रमांस गती आल्याचे प्राचार्य राजुरकर यांनी मत मांडून शिबिर आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. निखिल गायकवाड यांनी वाहतूकीचे नियम यावर भाष्य केले तर स्वयंसेवक कु. नेहा गुप्ता यांनी शिबिरांविषयी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. सारिका लांडे, हर्षल कडस्कर, पलक नगराळे,नाहार महातव, करण नागोसे, सुमित बदकी आदींना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

     सूत्रसंचालन निदेशक किशोर इरदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. सलोनी बोडणे यांनी केले. 

शिबिराच्या यशस्वितेसाठी निदेशक श्री. सुतार, धुळसे, गराड, सोरते, बोढाले, कदम,भोंगाडे , भांडार विभागाचे श्री . सिडाम, श्री. रामटेके, श्री. बोडखे तसेच सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here