Home चंद्रपूर महिलांची सुरक्षा संबंधित कायदेविषयक जागरूकता वाढविणे आवश्यक – पीएसआय वर्षा नैताम

महिलांची सुरक्षा संबंधित कायदेविषयक जागरूकता वाढविणे आवश्यक – पीएसआय वर्षा नैताम

112

▪️शास. औ. प्र. संस्थेत महिला सुरक्षा आणि कायदे विषयावर मार्गदर्शन 

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.24मार्च):-ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिर संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आले होते. महिला सुरक्षा आणि कायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांना आमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार बंडोपंत बोढेकर होते. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट च्या कु. प्रगती निशा प्रभुदास, समन्वयक रितु पहानपटे , समुपदेशक पुनम गेडाम, कार्यक्रम अधिकारी आर.पी. श्रीरामे, सहकार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार आदींची उपस्थिती होती.

      अलिकडच्या काळात महिलांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. महिला सुरक्षा ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून या विषयीची माहिती आणि कायदेविषयक जागरूकता वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी वर्षा नैताम यांनी केले. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट च्या कु. प्रगती प्रभूदास यांनी मासिक पाळी व्यवस्थापन यावर विचार मांडले. तर एम पावर उपक्रमाच्या समुपदेशक कु. पुनम गेडाम यांनी मानसिक आरोग्यांवर विचार मांडले.

   या सत्राचे सूत्रसंचालन कु. मारिया उराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. सोनल रंगारी यांनी केले. शिबिराचा समारोप संस्थेचे प्राचार्य गजानन राजुरकर , नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, असिस्टंट परिवहन अधिकारी निखिल गायकवाड आदींच्या उपस्थितीत झाला.

        स्वयंसेवक कु. नेहा गुप्ता यांनी शिबिरांविषयी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. सारिका लांडे, हर्षल कडस्कर, पलक नगराळे,नाहार महातव, करण नागोसे, सुमित बदकी आदींना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वितेसाठी निदेशक श्री. सुतार, धुळसे, गराड, सोरते, बोढाले, कदम,भोंगाडे तसेच सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here