


▪️शेकऱ्यांना मोठा दिलासा
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.24मार्च):– रब्बी हंगाम २०२५-२६ साठी शासकीय हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत चना व तूर खरेदीला राजुरा येथे अधिकृत सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या योजनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळून आर्थिक दिलासा मिळणार आहे.
दि विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, गणेशपेठ, नागपूर यांच्या मार्फत राजुरा तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्या., राजुरा (जि. चंद्रपूर) येथे ही खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार चन्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५८७५ रुपये तर तुरीचा हमीभाव प्रति क्विंटल ८००० रुपये निश्चित करण्यात आला आहे. या खरेदीसाठी ९ मार्च २०२६ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरणासह बायोमेट्रिक पद्धतीने ३१ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, संचालक अँड. अरूणभाऊ धोटे, विनोद झाडे, संतोष इंदूरवार, आशिष नलगे, लहु बोंडे, सचिव मोनिका मेश्राम, जिल्हा पनन व्यवस्थापक रसिक बच्चुवार, राजुरा खरेदी – विक्री चे सभापती प्रभाकर येरणे, उपसभापती दिपक वांढरे, संचालक महादेव ब्राह्मणे, योगेश बोढे, इंदिरा जिनिंग चे उपाध्यक्ष अरूण लांडे, शेतकरी मंगेश पोथले, योगेश ढवळे, संदीप सातपुते, कमलेश सातपुते, गजानन चोथले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.














