Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

63

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.13मार्च):-प्रत्येक स्त्रीच्या कर्तुत्वचा, अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस म्हणून ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सौ. जागृती कुमरे मॅडम, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या प्रा. डॉ. प्रणाली टेंभुर्णे उपस्थित होत्या . दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

          कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जागृती कुमरे मॅडम यांनी स्त्रियांचे अधिकार काय आहेत ते सांगण्यासाठी विविध शासकिय तरतुदी स्पष्ट केल्या. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ. प्रणाली टेंभुर्णे यांनी महिला स्वावलंबी व भावनिक स्वरूपाच्या असतात आणि आपल्या कामावर किती प्रभुत्व असतो यावर सखोल चर्चा केली. अध्यक्षीय भाषण करताना प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांनी लिंगभेद समानते वर मार्गदर्शन केले व तसेच स्त्रिया विविध कामगिरीत अग्रेसर आहेत ही उदहरणातून सांगितले.       

                                      कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सरताज शेख, समन्वयक, अंतर्गत तक्रार समिती यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्रद्धा डोईजड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रणाली टेंभुर्णी यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here