


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.17फेब्रुवारी):- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) रुपाली चाकणकर ह्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन कार्यालय, चंद्रपूर येथे महिलांच्या समस्येकरिता ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गंत जनसुनावणी घेणार आहे.
तरी चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या महिलांना त्यांच्या समस्येबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे निवेदन करावयाचे आहे, त्यांनी 18 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, चंद्रपूर या ठिकाणी जनसुनावणीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.














