


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.6फेब्रुवारी):- येथे स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे मंगळवार,दिनांक ३ फेब्रुवारी रोजी गंगाखेड शहरात आगमन झाले होते यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अस्थिकलशाचे भावपूर्ण अंतदर्शन घेतले.
स्व.अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून,त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गंगाखेड येथे अस्थी-दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मंगळवारी दुपारी ३ वाजता अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
(दिनांक ५ फेब्रुवारी गुरुवार) रोजी गंगाखेड येथील पवित्र गोदावरी घाटावर धार्मिक विधींनी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.हा क्षण संपूर्ण गंगाखेड शहरासाठी अत्यंत भावनिक ठरला होता याप्रसंगी घाटावरील वातावरण अश्रूंनी भारून गेले होते.या श्रद्धांजली व अस्थी-विसर्जन कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभेचे आ.राजेश विटेकर,माजी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे,गटनेते ॲड.मिथिलेश केंद्रे,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














