


▪️”नर्सिंग ऑफिसर्स फाऊंडेशन” महाराष्ट्र राज्य यांचा पुढाकार
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.2फेब्रुवारी):-“नर्सिंग ऑफिसर्स फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य” यांनी भारतीय नर्सिंग व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रांतिकारी पाऊल टाकत शैक्षणिक, सामाजिक, परिचर्या, रोजगार
क्षेत्रात एकत्रित प्रयत्नांना चालना देण्यासाठी , नर्सिंग ऑफिसर्स यांचे प्रश्न देशपातळीवर सोडवण्यासाठी मोबाईल ॲप चे निर्माण करण्यात आले आहे.
२६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर “नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य” ने भारतीय परिचारिका बंधु भगिनींसाठी एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला असून फाउंडेशनने आपले अधिकृत मोबाइल ॲप अधिकृतरित्या लाँच केले असून, हे ॲप भारतातील,महाराष्ट्रातील हजारो नर्सिंग ऑफिसर्सना एक मजबूत, एकसंध आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.
या ॲप च्या माध्यमातून नर्सिंग व्यावसायिकांना शैक्षणिक विकास, व्यावसायिक कौशल्य वृद्धी, रोजगाराच्या संधी, न्यायिक लढे, सामाजिक कल्याण, राजकीय जागरूकता आणि हक्कांच्या रक्षणासाठी विविध सेवा-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत हे ॲप संपुर्ण नर्सिंग समुदायाला एकत्र जोडण्याचे,आणण्याचे, त्यांच्या समस्या मांडण्याचे आणि सामूहिकरित्या त्यावर उपाययोजना करण्याचे एक शक्तिशाली प्रभावी साधन ठरणार आहे. फाउंडेशनची उद्दिष्टे आणि दूरदृष्टी
“नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य” ची संकल्पना अध्यक्ष श्री. मिलिंद मोटे सर यांच्या प्रेरणेने साकार झाली असून, फाउंडेशनची घटना प्रधान सचिव श्री. नागसेन भालेराव सर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केली आहे. फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट नर्सिंग व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या हक्कांचे संरक्षण, शिक्षणातील सुधारणा, देशी,परदेशी नोकरीच्या अनेकानेक संधी, सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे आणि राजकीय स्तरावर प्रभावी सहभाग सुनिश्चित करणे हे आहे.
नियामक मंडळ आणि सल्लागार मंडळ
फाउंडेशनच्या गव्हर्निंग बोर्डमध्ये खालील प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांचा समावेश आहे:
अध्यक्ष – श्री. मिलिंद मोटे सर
80825 55896
प्रधान सचिव – श्री. नागसेन भालेराव सर
77670 30080
खजिनदार – श्री. अक्षय जाधव सर 96375 90545
सोशल मीडिया प्रमुख – श्री. महेश पाडवी सर 80979 03619
प्रवक्ता – श्री. कृणाल मलकापूरे सर
7875710508
राज्य संघटक – श्री. पवन आटोळे सर
86059 38378
तसेच व्यावसायिक सल्लागार म्हणून श्री. निंगराज विंचुरे सर, कायदा तज्ज्ञ ॲड. रचना अग्रवाल मॅडम, सामाजिक व राजकीय सल्लागार श्री. प्रमोद दादा पाटील साहेब आणि क्रीडा सल्लागार श्री. विशाल वडतकर साहेब यांचा समावेश आहे.
भारतीय नर्सिंग ऑफिसर्स ( स्टाफ )यांना
फाउंडेशनचे प्रवक्ता श्री. कृणाल मलकापूरे सर यांनी आवाहन केले की प्रत्येक नर्सिंग ऑफिसरने या फाउंडेशनचे ॲप ताबडतोब डाउनलोड करून आपले प्रश्न प्राधान्याने सोडवून,एकत्र येऊन आपण नर्सिंग क्षेत्राला अधिक मजबूत, सन्मानित आणि व्यावसायिकदृष्ट्या समृद्ध बनवू शकतो हे ॲप फक्त तंत्रज्ञानाचे साधन नाही, तर आपल्या “समुदायाच्या एकजुटीचे आणि प्रगतीचे प्रतीक” आहे असे सांगितले आहे.
ॲप च्या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश
शैक्षणिक अपडेट्स, प्रशिक्षण कार्यक्रम संधी
देश विदेशात रोजगाराच्या संधी, जॉब अलर्ट आणि करिअर मार्गदर्शन
व्यावसायिक विकासासाठी वर्कशॉप, सेमिनार आणि नेटवर्किंग
न्यायिक मदत, कायदेशीर सल्ला आणि हक्कांच्या रक्षणासाठी सहाय्य
सामाजिक कल्याण योजना, आरोग्य विमा आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम
राजकीय जागरूकता, निवडणूक मार्गदर्शन आणि नेतृत्व विकास
हे ॲप देशभरातील,राज्यभरातील नर्सिंग ऑफिसर्सना एकमेकांशी जोडण्यासोबतच त्यांच्या समस्या केंद्र आणि राज्य सरकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा देशपातळीवरील, महाराष्ट्रपातळी वरील नर्सिंग क्षेत्रातील सर्व वरिष्ठ मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
“नर्सिंग ऑफिसर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य” च्या या देशपातळीच्या आत्याधुनिक उपक्रमाने नर्सिंग समुदायासाठी एक नवीन अध्याय सुरू केला आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर या ऐतिहासिक प्रसंगी प्रसारित झालेल्या या ॲप मुळे नर्सिंग व्यावसायिकांच्या हक्क, प्रतिष्ठा आणि विकासासाठी नवीन ऊर्जा प्राप्त होईल जे फाउंडेशन सोबत सक्रीय होऊन नर्सिंग प्रोफेशनसाठी योगदान देऊ इच्छितात त्यांनी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा लवकरच जिल्हास्तर आणि विभागीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांचे निवडी जाहीर करण्यात येणार आहेत फाउंडेशनला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त सहकार्य आणि शुभेच्छा दिल्या जात आहेत अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.














