Home महाराष्ट्र अग्रणी सोशल फौंडेशन विटा,जि.सांगली या संस्थेचा ४ फेब्रुवारी रोजी १० वा.वर्धापनदिन

अग्रणी सोशल फौंडेशन विटा,जि.सांगली या संस्थेचा ४ फेब्रुवारी रोजी १० वा.वर्धापनदिन

181

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.2फेब्रुवारी):-गेली ९ वर्षे संस्था सांगली जिल्ह्यातील वंचीत समुह,भटके विमुक्त,एकल महिला व अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास व मानवाधिकारासाठी काम करत आहे. सर्वेक्षण, प्रबोधन,संघटन, क्षमता बांधणी व नेतृत्व विकास या प्रक्रियेतून वंचित समुहात स्वाभिमान, स्वावलंबन,सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. संविधान मुल्यानुसार समाजातील अति दुर्बल, उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी प्रकल्प, उपक्रम व कार्यक्रम आखले जातात.

अग्रणी ही फक्त स्वयंसेवी संस्था नसून ती एक व्यापक परिवर्तनाची चळवळ आहे.कारण पुरोगामी विचार, महामानवांचा आदर्श, कालबाह्य प्रथांचे निर्मुलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, लोकशाही प्रक्रियेत सहभागास प्रोत्साहन, प्रशिक्षित व वैचारिक बैठक असलेले कार्यकर्त्यांची फळी या भांडवलावर संस्था व्यवस्था परिवर्तन व मानवी मुल्य प्रस्थापित करण्यासाठी झटत आहे. भटकेविमुक्त संयोजन समिती,एकल महिला संघटना, अल्पसंख्याक विकास मंच, नेतृत्वविकास, लोकशाही व संविधान साक्षरता प्रकल्प, कौशल्य विकास प्रशिक्षण, हसत खेळत विज्ञान या माध्यमातून प्रत्यक्ष कृति कार्यक्रम आयोजित केला जातो. ४ फेब्रुवारी रोजीचा वर्धापन दिन, २६ जुनचा रा.शाहू महाराज जयंती ( सामाजिक न्याय दिन) ,३१ आॅगस्टचा विमुक्त दिन व २६ नोव्हेंबर ( संविधान दिन) ते, १० डिसेंबर ( महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा),३ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी (दशरात्रोत्सव ) अभियान असे मोजकेच उपक्रम साजरे करण्यात येतात.

या संस्थेमध्ये शैलजा भिंगारदेवे, मंगल भादुले,मनोज कांबळे, शोभाताई लोंढे,नंदाताई खैरमोडे, मंदाताई सोनताटे, सुनिता कांबळे,सुहासिनी शिंदे,हजरत सोनीकर,सतिश शिकलगार,आयुब मुलाणी,सागर माने,लता तवर,कबीर कांबळे,सविता काकडे,गणेश धेंडे, सुनिता पवार व मुनीर शिकलगार यांचे संचालक मंडळ ग्रासरूटवर कार्यरत आहे.संस्थाचा भावी काळात भटकेविमुक्त, अल्पसंख्याक व वंचित समुहासाठी वस्तीगृह, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र व विद्यार्थी वैज्ञानिक प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

सध्या संस्थेला कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्याने लोकवर्गणी, स्थानिक मदत व कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यक्रम आयोजित करून समाजप्रबोधन व परिवर्तनाचे राष्ट्रीय कार्य करीत आहे.यापुढे ही व्यवस्था परिवर्तनासाठी ही अग्रणी संस्था वैचारिक व नेतृत्व विकासासाठी कार्यरत राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here