Home महाराष्ट्र राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर 

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर 

423

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.1फेब्रुवारी):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रस्तुत पुरस्कार गोयेगाव (मंडल केरामेरी) जि. आसिफाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचार कृती संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारकृती पुरस्कार श्री. गोपाळ कडू प्रचारप्रमुख गुरुकुंज आश्रम , किसन वडस्कर स्मृती समन्वयक पुरस्कार श्री.संजय वैद्य वरोरा यांना,लिलाबाई वडस्कर स्मृती कीर्तनसेवा पुरस्कार श्री. उदार महाराज बेला यांना, आनंदीबाई मांडवकर स्मृती श्रीगुरुदेव प्रचारक पुरस्कार श्री.पांडुरंग शेंडे देवाडा यांना, डॉ.मोतीजी महाराज स्मृती श्रीगुरुदेव वैद्यकीय सेवा पुरस्कार श्री.सुभान शेख यांना,

 जगन्नाथजी गावंडे स्मृती श्रीगुरुदेव सामाजिक कार्य पुरस्कार श्री.केवलराम गेडाम यांना, माधव जेनेकर स्मृती श्रीगुरुदेव कृषी सेवा पुरस्कार श्री.शिवाजी भेदोडकर यांना,

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार दिलीप वावरे यांना, साने गुरुजी शिक्षक पुरस्कार डॉ. धर्मा गावंडे यांना, श्रीगुरुदेव गोसेवा पुरस्कार श्री.बापूजी आदे (गोयेगाव) यांना लटारी उगे स्मृती व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रकाश सोनटक्के (सांगडी) यांना तुळसाबाई चौधरी स्मृती उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्कार श्री.अनुराग मुळे यांना, सदारामजी पारधी स्मृती श्रीगुरुदेव भजनसेवा पुरस्कार श्री. प्रल्हाद उईके रामपूर यांना,

 यशवंत बोबडे स्मृती श्री गुरुदेव श्रमश्री पुरस्कार सुरेश चौधरी नांदा यांना,पुरुषोत्तम हिरादेवे स्मृती श्रीगुरुदेव पत्रकारीता पुरस्कार उदय धकाते (गडचिरोली) यांना, प्रमोद देशमुख स्मृती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षक पुरस्कार मनोहर बोबडे (टेंबुरवाही) यांना किसन नवघरे स्मृती श्रीगुरुदेव प्रचार पुरस्कार बावणे महाराज( वानेरी) यांना

,रुखमाबाई बोबडे स्मृती महिला सेविका पुरस्कार सौ.शुभांगी अनमुलवार यांना,शोभाताई हिरादेवे स्मृती मातामंजुळा प्रचारिका पुरस्कार सौ. मालुताई कोंडेकर ऊर्जानगर यांना आनंदाबाई मत्ते स्मृती सेवाभावी दांम्पत्य पुरस्कार सौ.आशाताई संजय लोहे (कढोली ) यांना,

कर्णुजी देवाळकर स्मृती योग सेवा पुरस्कार विनायक साळवे (बामणी) यांना,पोच्चक्का मंचलवार उत्कृष्ट श्रीगुरुदेव सेवा मंडळ पुरस्कार श्रीगुरुदेव सेवा मंडळ पेंढरी (कोके) यांना,

चिमणाबाबू झाडे स्मृती सामाजिक सेवा पुरस्कार उद्धवराव ऊरकुडे (पेल्लोरा) यांना ,श्रमिक एल्गार प्रतिष्ठान द्वारा श्रीगुरुदेव विधीसेवा तथा महिला जनजागृती पुरस्कार ॲड.सारीका जेनेकर यांना देण्यात येणार आहे. दि. ७ फेब्रुवारी रोजी गोयेगाव येथे जनप्रबोधनपर कार्यक्रम होणार असून त्यात चेतन ठाकरे यांचे भारूड, अनुराग मुळे यांचे एकपात्री प्रयोग, पालिकचंद बिसने यांचे बासरी वादन, पुरूषोत्तम लांजेवार यांच्या नाट्य छटा,‌ बावणे महाराज यांचे कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

निवड झालेल्या मान्यवरांचे परिषदेचे एड. कल्याण कुमार, एड.राजेंद्र जेनेकर, लटारू मत्ते, बळीराम बोबडे, नामदेव गेडकर, विलास चौधरी, विशाल गावंडे, पंढरीनाथ चंदनखेडे,प्रेमलाल पारधी, केशव दशमुखे, विलास उगे, भाऊराव बोबडे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here