Home महाराष्ट्र नेताजी सुभाषचंद्र बोस देशभक्तांचे देशभक्त – प्रा. डॉ. ब्रह्मदेव सरक

नेताजी सुभाषचंद्र बोस देशभक्तांचे देशभक्त – प्रा. डॉ. ब्रह्मदेव सरक

103

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

     म्हसवड-सातारा(दि.31जानेवारी):- ‘ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी “आझाद हिंद सेनेची “स्थापना ( INA ) “जय हिंद ” चा, नारा आणि “तुम मुझे खून दो. मैं तुम्हे आजादी मिला दूंगा ” यासारख्या प्रेरणादायी आवाहनातून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारून स्वातंत्र्याची धगधगती मशाल पेटवली.”द इंडियन स्ट्रगल “या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे भाष्य केले.

त्यांचा धाडसी, क्रांतिकारक दृष्टिकोन तसेच त्यांनी देशासाठी दिलेले बलिदान यामुळे त्यांचे एकूण कार्य भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अविस्मरणीय ठरले आहे.गांधीजी आणि त्यांच्या विचारसरणीत मतभेद असले तरी त्यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्य आणि निष्ठेचे कौतुक करताना गांधीजींनी त्यांना ” Prince among the Patriots ” असे म्हटले होते. त्यामुळे २३ जानेवारी हा नेताजींचा जयंती दिवस “पराक्रम दिवस “किंवा “शौर्य दिन ” म्हणून सर्व भारतभर साजरा केला जातो ‘असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक,प्रमुख वक्ते – अतिथी डॉ.बी.जी.सरक यांनी केले.

‘राज्यशास्त्र विभाग ‘ व ‘महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ‘(IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित’१२९ ‘व्या नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त “नेताजी सुभाषचंद्र बोस: जीवन व कार्य ” या विषयावर ते बोलत होते.याप्रसंगी अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. डॉ.महेशकुमार सोनावणे हे होते कार्यक्रमाच्या आरंभी प्रमुख वक्ते – अतिथींच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मानवंदना देण्यात आली . नंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर जी.पवार यांनी प्रमुख वक्ते – अतिथी,अध्यक्ष व मान्यवर यांचे स्वागत करून प्रास्ताविकात नेताजींच्या कार्याचा सर्वांगिण आढावा घेतला.

प्रस्तुत विभागात संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित, इतिहास विभाग प्रमुख प्रा. विशाल मोरे,हिंदी विभाग प्रमुख डॉ. रमेश बोबडे हे मान्यवर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका,शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम समारोपानंतर राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा.सयाजी माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here