


✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.14जानेवारी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव पीएम -उषा, नवी दिल्ली अंतर्गत तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय चोपडा यांच्यातर्फे ‘Capacity Building of Teachers’ या विषयावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या सत्राच्या सुरुवातीला व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. तसेच यावेळी उपप्राचार्य प्राध्यापक डॉ.आर. एम. बागुल व वक्ते डॉ. किरण पाटील आदि उपस्थित होते.
दि.१२/०१/२०२६. रोजी कार्यशाळेच्या प्रथम सत्रात जळगाव येथील एस.एस.बी.टी. तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रा. डॉ. किरण पाटील यांनी ‘ FUTURE OF ARTIFICIAL INTELLIGENCE IN TEACHING, RESEARCH AND EDUCATION PART -I’ या विषयावर सोप्या व प्रभावी भाषेत अकॅडेमीक कॅलेंडर, टिचिंग प्लॅन, निकालांचे विश्लेषण, रिसर्च आऊटलाईन, प्लॅगॅरिझम, डेटाबेस तसेच संशोधनात कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करण्यासाठी कोणकोणते ऍप्स वापरावेत यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात जळगाव येथील एस. एस. बी. टी. तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रा. डॉ. पंकज झोपे यांनी ‘BENEFIT OF ARTIFICIAL INTELLIGENCE IN RESEARCH AND EDUCATION PART -II’ या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी Translate, Visualization Tools, Dimension. AI, Elicit, consensus, Data. Gov, Prompt Engineering, Research buddy, AI writer, Journal finder अशा संशोधनासाठी उपयुक्त साधनांचा वापर कसा करावा याविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे डॉ. एल. बी. पटले यांनी ‘Moocs Design and Development-II’ या विषयावर मार्गदर्शन करतांना त्यांनी openedx या LMS tools चे प्रात्यक्षिक करून दाखविले.
कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात दादासाहेब श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन व फार्मसी महाविद्यालय, चोपडा येथील इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागाचे डॉ. कमलेश पाटील यांनी ‘Moocs Design and Development-I’ या विषयावर मार्गदर्शन करून Moocs निंर्मिती विषयीची सविस्तर माहिती दिली.
दि.१३/०१/२०२६. रोजी कार्यशाळेच्या प्रथम व द्वितीय सत्रात शिरपूर येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयाचे प्रो. डॉ. प्रेमकिरण भदाणे यांनी A FORMATIVE ASSESSMENT TOOLS PLICKERS CARD तसेच दुसऱ्या सत्रात AN INTRODUCTION TO LMS MOODLE या महत्वपूर्ण विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या तिसऱ्या सत्रात खानदेश एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय जळगाव येथील प्रोफेसर केतन चौधरी यांनी LMS Google Apps या विषयावर मार्गदर्शन करतांना Google Classroom विषयी सविस्तर माहिती प्रात्यक्षिकद्वारे समजावून सांगितली.
या कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात जळगाव येथील एकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील डॉक्टर ईश्वर सोनगरे यांनी E-Examination and E-Assessment या विषयावर मार्गदर्शन केले.यात त्यांनी ऑनलाईन परीक्षा पद्धती व ऑनलाईन माध्यमे यांचा परिचय करून दिला.
सदर कार्यशाळेमुळे प्राध्यापकांमध्ये संशोधन, अध्ययन व अध्यापन यातील AI च्या वापरविषयी आवड वाढली असून भविष्यातील तांत्रिक कौशल्य विकासासाठी ही कार्यशाळा निश्चितच उपयुक्त ठरली आहे.कार्यशाळेच्या विविध सत्रांचे सूत्रसंचालन डॉ.पी. एन. सौदागर यांनी केले तर आभार डॉ.जे. जी. पाटील यांनी मानले.या कार्यशाळेप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.














