Home महाराष्ट्र रेल्वे गेट ते संत जनाबाई महाविद्यालयाचा चढ बनला मृत्यूचा सापळ

रेल्वे गेट ते संत जनाबाई महाविद्यालयाचा चढ बनला मृत्यूचा सापळ

351

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.10डिसेंबर):- सर्कस मधील मौत का कुवा खेळ दाखवणारा आपण पाहिला असेल, तो बिचारा दोन पैसे कमावण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून खेळ दाखवत असतो. पण या मृत्यूच्या सापळ्याचा सामना रेल्वे पटरीच्या वर राहणाऱ्या नागरिकांना दररोज करावा लागत आहे. गंगाखेड शहराची विभागणी दोन टप्प्यात झालेली आहे. ते म्हणजे रेल्वे पटरी च्या खाली असलेला एक भाग व रेल्वे पटरीच्या वर असलेला दुसरा भाग. बहुसंख्य गंगाखेड वासी हे या रेल्वे पटरी च्या वरील भागात राहतात व या भागामध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये या रोडवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

त्यामध्ये कधी कोणाचा जीव जाईल, कधी कोणासोबत अपघात घडेल हे कोणीही सांगू शकणार नाही, इतकी भयान परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे. सर्वप्रथम ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक याच्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे, जागोजागी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ,त्यामधून कसाबसा मार्ग काढत वाहनधारकांना आपली वाहने काढावी लागतात. त्यानंतर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक अतिशय धोकादायक पद्धतीने त्यांची वाहतूक होते, प्रमाणाच्या बाहेर भरलेला ट्रॅक्टर वर ट्रक मधील ऊस, तसेच खड्ड्यांमधून व गतिरोधकावरून हेलकावे खाणारे ट्रॅक्टर, ओव्हरलोडींग मुळे पुढे न ओढले जाणारे ट्रॅक्टरचे हेड, त्यासाठी दुसरे हेड लावून दोन दोन हेडच्या साह्याने संत जनाबाई महाविद्यालयाचा चढ चढण्याची कसरत करणारे ट्रॅक्टर तर सध्या गंगाखेड मधील रेल्वे पटरीच्या वर राहणाऱ्या नागरिकांना दररोज त्यांची कसरत पाहायला मिळत आहे.

या भागामध्ये दर एक दिवसाआड दुर्घटना नित्याची बाब झालेली आहे. ट्रॉली पलटी होणे, ट्रॅक्टर पलटी होणे, वाहन रस्त्याच्या मधोमध बंद पडणे, या घटना बऱ्याच वेळेला घडलेल्या आहेत.ट्रॅक्टर चढावर चढत नाही अशा परिस्थितीमध्ये ट्रॅक्टर वाले मोठे मोठे दगड लावतात व ट्रॅक्टर पुढे गेल्यानंतर ते मोठमोठे दगड रस्त्याच्या बाजूला टाकण्याची सुद्धा तसदी घेत नाहीत ,अशा परिस्थितीमध्ये अपघात होण्याची दाट शक्यता असते, किंबहुना अनेक अपघात झालेले आहेत . विशेष म्हणजे आता सर्व सरकारी कार्यालय रेल्वे पट्टीच्या वरील भागातच झालेली आहे व त्यामुळे या भागात नागरिकांची सतत रहदारी असते.तरी प्रशासनाने याची तात्काळ व गंभीर दखल घेऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी रेल्वे गेटच्या वर राहणाऱ्या सर्व नागरिकांमधून होत आहे. 

दैनिक लोकमतचे माजी प्रतिनिधी गोपाळ मंत्री यांचा दिनांक 9 डिसेंबर रोजी मोठा अपघात होता होता ते थोडक्यात बचावले. दिनांक 9 डिसेंबर रोजी मी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जेव्हा माझ्या घरापासून खाली गंगाखेड शहरामध्ये येण्यासाठी निघालो, तेव्हा संत जनाबाई महाविद्यालयाच्या गेट जवळ रस्त्यामध्ये एक भला मोठा दगड पडलेला होता, त्याला माझ्या मोटरसायकलची धडक लागली, माझ्या बाजूने एक ओव्हरलोडींग झालेला ट्रॅक्टर जात होता, तो दगड व माझी मोटरसायकल जवळपास वीस फुटापर्यंत फरपटत गेलो, मागून वाहनांची वाहतूक चालू होती, समोरून पण वाहतूक चालू होती, मी जर खाली पडलो असतो तर मोठा अनर्थ झाला असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here