


▪️महात्मा फुले विद्यालय व कमवि मध्ये महापरिनिर्वाण दिन संपन्न
▪️गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून प्रा.बुंदेले यांनी साजरा केला महापरिनिर्वाण दिन
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.7डिसेंबर):-“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले संदेश अनमोल आहेत.त्यांचे विद्यार्थी जीवन अतिशय संघर्षमय पण अध्ययनशील होते.
एल्फिन्स्टन्स हायस्कूलमध्ये असताना त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास केला.त्यांनी ही अध्ययनशीलता उच्च शिक्षण घेतानाही कायम ठेवली त्यामुळे ते अनेक उच्च पदव्या प्राप्त करू शकले.आजच्या विद्यार्थ्यांनी बौद्धिक परिश्रम,जिद्द व चिकाटी हे बाबासाहेबांचे अभ्यासविषयक गुण आचरणात आणणे आवश्यक आहे.डॉ.आंबेडकर आजच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान आहेत. “असे विचार अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते दि.६ डिसेंबर २०२५ रोजी महात्मा फुले शिक्षण समिती द्वारा संचलित महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुधोळकर पेठ अमरावती येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करत होते.
महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती मंदाकिनी निमकर (अध्यक्षा, महात्मा फुले शिक्षण समिती, अमरावती.) प्रमुख वक्ते विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बा.बुंदेले,प्रमुख अतिथी मा. किशोर श्रीखंडे (सहसचिव, महात्मा फुले शिक्षण समिती, अमरावती.) कु.वृषाली वि. टाकरखेडे (प्राचार्य, महात्मा फुले विद्यालय व कमवि, अमरावती) होते .
अध्यक्ष, प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन केले.
प्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्धलेखन व वळणदार हस्ताक्षर सुधार प्रकल्प नोटबुक्स सस्नेह भेट देऊन महापरिनिर्वाण दिन साजरा केला आणि या प्रकल्पाचे महत्त्व समजावून सांगितले व स्वनिर्मित आदर्श विद्यार्थी प्रबोधन मालेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा?किती करावा? वाचनाचे महत्त्व व प्रकार, आदर्श अभ्यासाचे तंत्र हे अभ्यास विषयक मुद्दे प्रासादिक भाषेत समजावून सांगितले.असा अभ्यास विद्यार्थ्यांनी केल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील आदर्श विद्यार्थी घडू शकतो.”असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्षा श्रीमती मंदाकिनी निमकर, प्रमुख अतिथी किशोर श्रीखंडे यांनी मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
प्रास्ताविक प्राचार्या कु .वृषाली वि. टाकरखेडे यांनी केले. संचालन सौ.जयश्री राऊत मॅडम तर आभार गजानन पोटदुखे यांनी मानले.
कार्यक्रमाला प्रा.संजय शेंडे, अमोल इंगळे, अनिल मावस्कर, मंगेश गोरडे, शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी किसन चव्हाण, राजेश ढेवले, रजत खडसे व बहुसंख्य विद्यार्थी हजर होते.














