


▪️महसूल विभागाची मोठीं कारवाई!
✒️विशेष प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)
नायगाव (खै) गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी बिलोलीच्या कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी (एस .डी. एम) क्रांती डोंबे यांनी मध्यरात्री मोठ्या धाडसाने कारवाई करत वाळू माफियांना मोठा अविस्मरणीय झटका दिला आहे. विषेश म्हणजे क्रांती डोंबे यांनी त्या मध्यरात्री त्यांच्या दोन वर्षांच्या बाळाला सोबत घेवून, आपल्या महसूल विभाग पथक सहकार्यांच्या बळार कुठलेही परवा न करता हे धाडशी कर्तव्य बजावत कार्यवाही केली. मौजे हुसा येथील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी वापरले जाणाऱ्या वाळू तस्कराचे तब्बल तीन मोठे तराफे जाळून नष्ट करण्यात आले, प्रशासनाने दाखवलेल्या कठोर भूमिकेमुळे अवैध वाळू व्यवसायाचे कंबरडे मोडले संपूर्ण उपविभागात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. प्राप्त माहितीनुसार वाळू तस्करांसाठी नदी तराप्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहिती अधिकारी क्रांती डोंबे यांना मिळाली होती.
तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच घुंगराळा येथील मंडळाचे अधिकारी आरू, तलाठी डाकेवार, तलाठी हसनापल्ले, कोतवाल बिस्मिल्ले, वाहन चालक नागेश, पुरी, ऑपरेटर शिवाजी पांचाळ ,सह आदींनी अत्यंत निष्ठेने कारवाईत पुढाकार घेतला, प्रशासनाचा ड्रायव्हर पुरी यांनीही महत्वाची भुमिका बजावली, संपूर्ण कारवाईत महसूल विभागाच्या पथकाने रात्रीच्या अंधारात व वाळू तस्करांना संभाव्य विरोधाला न जुमानता कमालीचा निर्धार दाखवला, यावेळी मौजे हुसा येथील गोदावरी नदीच्या तीरावर अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यासाठी तयार ठेवलेले वाळू तस्करांचे मोठ्या प्रमाणातील तिन तराफे साहित्य महसूल विभागाने जागेवर नष्ट केले, कारवाईची तीव्रता इतकी होती की तराफ्यानां आग लावून पूर्णपणे जाळून खाक करण्यात आले.
त्यामुळे वाळू माफियांना केवळ आर्थिक नुकसान नसून तर शासनाच्या झिरो टाॅलरन्स धोरणांचा स्पष्ट संदेश मिळाला. महसूल विभागाने दाखवलेला हा कणखरपणा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर नवीन विश्वास करणारा आहे. एस.डी. एम. क्रांती डोंबे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने वाळू तस्करांच्या अवैध धंद्याची नाकेबंदी करण्याची तयारी दर्शवली असुन भविष्यातही अशा धाडसी कारवाई सुरूच राहणार असा इशारा अवैध वाळू तस्करांना देण्यात आला.














