


✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.23नोव्हेंबर):-सलूनचे दुकान चालवून लहान भाऊ राजेशचे शिक्षण पूर्ण केले.तो नोकरीवरही लागला;पण त्याचा अपघातात मृत्यू झाला त्यामुळे मी चिंताग्रस्त झालो.भटकत राहिलो.
भटकताना मला पागल म्हणून समाजाने वाळीत टाकलेले बेघर, वेडे,मनोरुग्ण दिसले .ते कसे जगत असतील या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो .या अस्वस्थतेतूनच बेघर मनोरुग्णांची सेवा करण्याचा मार्ग मला मिळाला.नंददीप फाऊंडेशन ची स्थापना केली. आज 820 मनोरुग्णांपैकी 142 बेघर, मनोरुग्ण नंददीप मध्ये आहेत. इतर मनोरुग्ण बरे होऊन स्वघरी परतून आनंदाने जगत आहेत. आज 142 मनोरुग्णाची सर्वच व्यवस्था नंददीप समाजातील दानशूर व्यक्तींमुळे करीत आहे. सामाजिक बांधिलकी स्वीकारणाऱ्यांनी या कार्यात खारीचा वाटा उचलायचा असेल तर 8208229234 हा माझा फोन पे नंबर आहे. प्रा.बुंदेले सरांनी मला वडिलांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करून मला मनोरुग्ण सेवेसाठी बळ दिले. त्यांचा मी आभारी आहे.” असे विचार सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती मा.संदीप शिंदे यांनी व्यक्त केले.
ते दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात टोपे नगर, अमरावती येथे मनोरुग्णांच्या सेवेसाठी वाहिलेल्या नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप व सौ. नंदिनीताई शिंदे यांना दिलेल्या ” कै.बाबारावजी बुंदेले स्मृती मनोरुग्ण सेवा पुरस्कार ” सोहळ्याप्रसंगी दि.२० नोव्हेंबर २०२५ ला विचार व्यक्त करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक व्यवस्थापक श्री किशोर राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुरस्कार दाते प्रा. अरुण बुंदेले,सत्कारमूर्ती मा.संदीप शिंदे व सौ.नंदिनी शिंदे, प्रमुख अतिथी अनंत कौलगीकर (LIC डेव्हलपमेंट ऑफिसर), मुख्याध्याक दत्तात्रय देशपांडे, प्रा.किशोर देशमुख,मा. मुख्याध्यापक प्रा.बाबुराव शेळके, पंजाबराव धोटे,सुभाष गावंडे,राजेंद्र पाथरे, प्रमोद ठाकरे , लेखक अविनाश राजगुरे, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक मडळाचे सदस्य अनिल वानखडे होते.
कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे मनोरुग्ण सेवेच्या अनमोल कार्याबद्दल नंददीप फाउंडेशन यवतमाळचे संचालक मनोरुग्ण सेवक मा.संदीप शिंदे व सौ. नंदिनी शिंदे यांना” कै. बाबारावजी बुंदेले स्मृती मनोरुग्ण सेवा पुरस्कार – २०२५” ने प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,बँक व्यवस्थापक श्री किशोर राऊत व प्रमुख अतिथींच्या हस्ते रोख रक्कम पाच हजार रुपये, पुरस्काराचे सन्मानपत्र,शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व २५ पुस्तके देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँके तर्फे व्यवस्थापक श्री किशोर राऊत यांनी शिंदे दाम्पत्यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शिंदे दांम्पत्यांच्या सेवेमुळे होतो मनोरुग्णांचा पुनर्जन्म-प्रा.अरुण बुंदेले
” मनोरुग्ण सेवेसाठी वाहिलेल्या नंददीप फाउंडेशन यवतमाळचे संचालक मा. संदीपजी व सौ.नंदिनी शिंदे यांचे मनोरुग्ण सेवेचे कार्य अनमोल आहे. बेघर, मनोरुग्ण, वेडे, रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूने,बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशनवर दिसल्यानंतर शिंदे दांम्पत्य त्या मनोरुग्णांना नंददीय मध्ये आणून त्याची दाढी-कटींग करून आंघोळ घालून देण्याची सेवा व त्यांच्या राहण्याची – जेवणाची व्यवस्था करून त्याचे नंददीपमध्ये पुनर्वसन करतात. पागल, बेघर, मनोरुग्णांना ते नवजीवन देतात. ८२० पैकी ६७८ मनोरुग्ण बरे होऊन स्वतःच्या कुटुंबात परत जाऊन नवजीवन जगू लागले.शिंदे दांपत्यामुळे आमचा पुनर्जन्म झाला असे ते म्हणतात. अशा या शिंदे दांपत्यांच्या मनोरुग्ण सेवेला माझा सलाम ॥ माझ्या वडिलांच्या नावाने कै.बाबारावजी बुंदेले स्मृती मनोरुग्ण सेवा पुरस्कार – २०२५” हा पुरस्कार मनोरुग्ण सेवक शिंदे दांम्पत्यांना देऊन सन्मानित केले ते त्यांच्या मनोरुग्ण सेवेच्या अनमोल कार्यामुळेच. “असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुरस्कार दाते प्रा.अरुण बा.बुंदेले यांनी व्यक्त केले. व स्वारचित ” मनोरुग्ण सेवक संदीप शिंदे ” या अभंगाचे गायन केले.
—-
शिंदे दांम्पत्य मनोरुग्णांचे देव-किशोर राऊत
अध्यक्षीय भाषणातून श्री किशोर राऊत म्हणाले की,” मनोरुग्ण सेवेला स्वतःचे पूर्ण जीवन अर्पण करणारे शिंदे दांपत्यांचे कार्य महान आहे. बेघर, मनोरुग्ण, वेड्या लोकांसाठी ते जे कार्य करीत आहेत ते आई-वडील म्हातारे झाल्यावर आजचे मुलं सुद्धा करीत नाहीत.अशी मनोरुग्णांची सेवा शिंदे दांम्पत्य करीत आहेत.ते मनोरुग्णांचे देवच आहेत.त्यांच्या या कार्याला शुभेच्छा.” असे विचार अध्यक्षीय भाषणातून श्री किशोर राऊत यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला सौ.रंजना निचळ, अनिल चव्हाण, श्री मानकर सह श्रोतवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कु.पल्लवी ठाकरे ने केले. कार्यक्रमाचे सांगता अल्पोपहाराने झाली.















