


सत्ताधारी पक्षाकडे तिजोरी असते.पाहिजे तसा निधी जो कमीशन देईल त्याला मिळतो. म्हणून अनेक मतलबी नेते सत्ता पक्षात जातात.तसे जळगावचे गेले.
आता आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. सत्तापक्ष ईव्हिएमचा वापर करून पाहिजे तितके मतदान आपल्या कडे वळवून घेतो.विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होता. यात आणखी मेख मारून ठेवली आहे.मतदार यादीत बोगस मतदार घालून ठेवले.याचा अनुभव विधानसभा निवडणुकीत आला आहे.
ईव्हिएम मधील हेराफेरी आणि मत चोरी विरोधात तक्रार करायला नरेंद्र मोदींनी जागा शिल्लक ठेवली नाही. पोलिस, न्यायाधीश, जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयुक्त पैकी कोणीही तक्रार ऐकून घेत नाही.ते फक्त सत्तेचे नोकर आहेत. फक्त सरकारचे. म्हणजे ज्यांचे विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आहे, सरकार आहे त्यांचेच.
याचा अभ्यास जळगाव शहरातील जुने जाणते राजकीय लोकांनी केला आहे.तिकडे राहुल गांधी मत चोरी विरोधात खुप मेहनत घेत आहेत. तरीही नरेंद्र मोदी टस मस होत नाहीत. राहुल गांधी मोदींचे किंवा ज्ञानेश कुमार चे काहीच बिघडवून घेऊ शकत नाहीत. सुप्रिम कोर्ट सुद्धा पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही. मग काय करणार? कठीण जागेवरचे दुखणे आहे.जेथे हात पुरत नाही तेथे औषध कसे लावणार?
जळगाव मधील नगरसेवक ज्यांचा उपजीविकेचा व्यवसाय नगरपालिकेवर अवलंबून आहे त्यांनी दूरदृष्टी ठेवून सत्ता पक्षात प्रवेश केला आहे.विचारधारा आवडत नाही पण चोर धारा आवडते.त्यांचा नाईलाज झाला आहे.आदतसे मजबूर आहेत ते.
आता ही माणसे चोरीच्या उद्देशाने सत्ता पक्षात गेली. तर मग आपण हात बांधून गंमत पाहायची का?मला वाटते, यश, अपयश जे मिळेल ते. तरी पण शहर वाचवण्यासाठी लढलेच पाहिजे.कारण सत्ता पक्षात जाऊन धंदा पाणीची सोय करून घेणे सोपे आहे. पण सत्ता विरोधात खंबीरपणे ठाम उभे राहाणे कठीण आहे. पण ती काळाची गरज आहे.महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी शत्रू विरोधात खंबीरपणे उभे राहिले.म्हणून तर आज आपले आदर्श आहेत.
आता जळगाव शहरातील सुबुद्ध आणि प्रबुद्ध लोकांनी एकत्र येऊन माजोरी सत्ता विरोधात ठाम उभे राहाण्याचे आवाहन करीत आहोत. आपण लढत राहू. एक वेळ सत्ता कोसळणारच. कंस मामाची सत्ता गेली होती. रावणाची सत्ता गेली होती. हिटलरची सत्ता गेली होती. इंदिरा गांधींची सत्ता गेली होती. मोदी अपवाद नाहीत.
जळगाव शहरातील जे लोक माजोरी सत्ता विरोधात लढायला तयार असतील त्यांनी एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता आहे.आपल्याला जितकी हिंमत, हिकमत, ताकद असेल तितका लढा आपण देऊ. संपत्तीचा स्वार्थ नसेल तर काहीच बिघडणार नाही. चोरांची चीड असेल तर मन शांत बसत नाही .लढलेच पाहिजे. यश , अपयश काहीही असो पण परिणाम नक्कीच चांगला होईल!१७७६ ची पानिपतची लढाई वाया गेली का?१८५७ चे युद्ध वाया गेले का?१९४२ चे चले जाव आंदोलन वाया गेले का?१९७५ ची आणिबाणी विरोधातील लढा वाया गेला का?तशी तुमची लढाई वाया जाणार नाही.जो जिंकतो त्याला पृथ्वीवर राज्य मिळते. जो हारतो त्याला स्वर्गात राज्य मिळते.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














