Home पुणे डॉ. आनंद करंदीकर यांना अभिवादनासाठी सभा-श्रमिक भवन येथे २३ नोव्हेंबर रोजी!

डॉ. आनंद करंदीकर यांना अभिवादनासाठी सभा-श्रमिक भवन येथे २३ नोव्हेंबर रोजी!

107

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.21नोव्हेंबर):-कार्यकर्ते, विचारवंत, लेखक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ असलेले डॉ. आनंद करंदीकर यांचे निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी पुरोगामी संस्था संघटनांच्या पुढाकाराने २३ नोव्हेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यकर्ते विशाल विमल यांनी दिली. 

रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रमिक भवन, डेंगळे पुलाजवळ, महापालिकेच्या बाजूला, शिवाजीनगर, पुणे येथे अभिवादन सभा होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सरिता आवाड असणार आहेत. डॉ. आनंद करंदीकर हे कार्यकर्ते, विचारवंत, लेखक होते. व्यवस्थापन तज्ज्ञ होते. त्यांनी IIT व IIM मधून शिक्षण घेतले. जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले. ते तरुणांचे प्रेरणास्थान होते. जातीअंताचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यांनी विचारवेधच्या माध्यमातून वैचारिक घुसळण घडवली. श्वसनाच्या आजारामुळे त्यांचे मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांचे ७६ वर्षे वय होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here