Home महाराष्ट्र सुब्बई येथे आमदार देवराव भोंगळे यांचा नागरी सत्कार व भूमिपूजन सोहळा संपन्न

सुब्बई येथे आमदार देवराव भोंगळे यांचा नागरी सत्कार व भूमिपूजन सोहळा संपन्न

241

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.२८ऑक्टोबर):-तालुक्यातील सुब्बई येथे भारतीय जनता पक्ष व ग्रामस्थांचे वतीने आमदार देवराव भोंगळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.तसेच गावात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

या प्रसंगी आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते सुब्बई येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार भोंगळे म्हणाले, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांद्वारे निधी उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असून या भूमिपूजनामुळे सुब्बई व परिसरातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सोईसुविधायुक्त नवीन इमारत मिळणार आहे. तसेच गावातील पायाभूत सुविधा आणि विकासाच्या दिशेने नवी ऊर्जा निर्माण होणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. तसेच, सुब्बई ग्रामस्थांनी केलेल्या नागरी सत्काराबद्दल आमदार भोंगळे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

यावेळी भाजपा राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, सुब्बई येथील सरपंच सुरेखा आत्राम, उपसरपंच रामलू राठोड,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल उरकुडे, शंकर धनवलकर, महामंत्री हरिदास झाडे,सचिन बल्की,प्रदीप पाला , भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, निखिल अमर,शरद चापले, श्रीकांत आदेवार,नितेश कुरवटकर, दत्तू चापले, बाबुराव कुरवटकर,शुभम आदेवार, सुधाकर बुडपल्ले, सुनिल मेकर्तीवार,सुरेश अजमेरा, नरेश राठोड, व्यंकटेश घुगलोत, शंकर जाधव, आकाश चापले यांचेसह भाजपा कार्यकर्ते व सुब्बई येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here