Home Breaking News जी 7 शुगर लिमिटेड च्या १६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न...

जी 7 शुगर लिमिटेड च्या १६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न !

211

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.28ऑक्टोबर):-जी-7 शुगर लिमिटेड चा सन २०२५-२६ चा १६वा गळीत हंगाम शुभारंभ आज दि.२८/१०/२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता कारखान्यास मागील वर्षीच्या गळीत हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी व वाहतुक करणारे ठेकेदार श्री अशोक तुकाराम राठोड व त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच श्री. बालासाहेब ज्ञानोबा आवळे व त्यांच्या सुविद्य पत्णी यांचे हस्ते सत्यनारायण पूजा व तद्नंतर श्री. तुळजिराम पोले तसेच गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. संभाजीराव पोले, खरेदी विको संघ गंगाखेडचे संचालक श्री. बापु सातपुते इसादकर श्री. बालासाहेब राठोड, श्री. मगर पोले, गुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राजेंद्र डोंगरे, तसेच इतर मान्यवर व सर्व खाते प्रमुख, अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकुन पार पडला.

या प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. राजेंद्र डोंगरे यांनी गळीत हंगामासाठी विहित वेळेत गाळपाची तयारी पूर्ण केल्याबद्दल सर्व विभागांचे अभिनंदन केले. तसेच गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये १० लाख मे.टन ऊस गाळणाचे उदिष्टये पुर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होगाऱ्या ऊसास एफआरपी प्रमाणे ऊस दर देण्याचा मनोदय या प्रसंगी व्यक्त केला आहे.

त्या कारिता गळीत हंगाम २०२५-२६ करिता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकन्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पुरवठा करून सहकार्य करावे. तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वर्षी जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढेल याकरिता सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या ऊसाचे जास्तीत जास्त लागवड करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी हे कारखान्याचे आधारस्तंभ असुन त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता व्यवस्थापनाकडून घेतल्या जाईल असे आवर्जून सांगितले. त्याच बरोबर गळीत हंगामात ऊस पुरवठा करित असताना ऊस उत्पादक शेतक-यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक वा मानसिक पिळवणूक होत असल्यास त्यांनी तात्काळ हि बाब कारखाना व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एच. आर मेनेजर श्री. प्रदिप बेरुळकर यांनी केले. तसेच कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी श्री. हनुमंत लटपटे व गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री. संभाजीराव पोले यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना जी-7 शुगर लिमिटेड च्या गळीत हंगाम २०२५-२६ करिता जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उदिष्टये साध्य करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तसेच उपस्थितांचे आभार श्री. मिलिंद टिळक यांनी मानले.

सदर कार्यक्रमासाठी कारखाना परिसरातील शेतकरी, व्यापारी, तसेच कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here