


▪️पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.26ऑक्टोबर):
सध्याच्या काळात स्त्रियांना गुलाम बनवण्याचे नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार वाढत आहेत. जात, धर्म आणि देवाची भीती घालून त्यांना नव्या आधुनिक वर्णवादी गुलामीत लोटण्याचे राजकारण सुरू आहे. हे राजकारण कोण करत आहे हे ओळखून त्याविरुद्ध स्त्रियांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. स्त्रियांनी मानवतावादी भूमिका घेऊन पुरुषी गुलामी नाकारण्यासाठी व समतावादी समाज निर्माण करण्यासाठी बंडखोर होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिताताई पानसरे यांनी केले.
त्या आम्ही भारतीय महिला मंच, आयोजित फक्त महिलांनी, महिलांसाठी आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनात राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होत्या.
तत्पूर्वी संमेलनाच्या उद्घाटक स्मिताताई पानसरे व मान्यवरांच्या हस्ते स्त्रियांना गुलाम करणार्या मनुवादाचे डोके फोडून व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून उद्घाटन करण्यात आले.
संमेलनाच्या संमेलनाध्यक्षा कवयित्री आणि लेखिका रंजनाताई सानप म्हणाल्या, साहित्य क्षेत्रात महिलांनी प्रचंड योगदान दिले आहे. परंतु त्याची नोंद म्हणावी इतकी घेतली गेली नाही. स्त्रियांनी बिनधास्त व बंधमुक्त होऊन लिहिणे गरजेचे आहे. लेखणीला आपले हत्यार बनवून व्यवस्थेच्या विरोधात व्यक्त होण्यासाठी लढाऊ स्त्रियांनी पुढे येणे गरजेचे आहे. तरच आपणाला समतावादी समाज निर्माण करता येईल.
यावेळी स्वागताध्यक्ष सुमनताई पुजारी, प्रमुख पाहुण्या भारतीताई पवार, सरलाताई पाटील, षण्मुखा अर्दाळकर, डॉ. शोभा चाळके, सीमा पाटील, डॉ. स्वाती नांगरे, आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, समन्वयक अंतिमा कोल्हापूरकर यांनी मनोगते व्यक्त केली.
दिवसभर चाललेल्या संमेलनात बिना माने, डॉ. श्रद्धा कोठावळे, सानिका तुळसकर, सुलोचना बागडी, सरिता पाटील, विद्या नाळे, डॉ. विद्या राईकवार, प्रतिभा भंडारे, अनिता कांबळे, शारदा काटू, कमल वावरे, श्वेता काणेकर, माधुरी सावंत-भोसले, भारती कांबळे, डॉ. माया तिरमारे, रोशनी गंभीर, अर्चना कुलकर्णी, पूर्णिमा देसाई, डॉ. सोनाली इंगळे, प्रीती कांबळे, ॲड. संध्या देशपांडे, डॉ. अश्विनी बदादे, ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे, नीना जोशी, अर्चना घाडगे, शशिकला घाडगे, गीता लळीत, जया जोशी, सुरेखा भिंगले-डवर, सुनिता वाजंत्री, देवीना माने, गीता पोवार, प्रियाली शिंदे, हिराताई देशमुख, वंदना साळुंखे, प्रा. डॉ. वैशाली गुंजेकर आदी महिलांना यावर्षीचा लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुपारच्या सत्रात कवयित्री प्रा. सुचिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनात शशिकला सरगर, नसीम जमादार, नंदिनीताई पाटील, अपूर्वा पाटील, सरस्वती डवरी, वसुंधरा निकम, मुग्धा टेंगशे, पूर्णिमा देसाई, अश्विनी टाकळे, रोहिणी पराडकर, स्नेहलता कुरणे, दिप्ती कुलकर्णी, उज्वला जाधव, सुरेखा खेडेकर, त्रिशला शहा, सुनिता पेडणेकर, दया पाटील, वैशाली कांबळे, आशा धनाले, सुवर्णा पवार, डॉ. रजनी रणपिसे, उर्मिला शहा, शितल साळगावकर, प्रा. विभा शहा, वनिता पाटील, वनिता भोरे, उर्मिला आसगेकर, प्रांजली चौधरी, वर्षा शिंत्रे, वसुमती मोकाशी, अनुराधा कुलकर्णी, निशा शिंदे आदी कवयित्रीनी आपल्या कविता सादर केल्या.
विमल पोखर्णीकर, अनिता गायकवाड, वृषाली कवठेकर, नीती उराडे, राजश्री मधाळे, अनिता बावडेकर, ॲड. तमन्ना मुल्ला, आशा केसरकर, प्रीती पवार, मंगल समुद्रे, शकुंतला सावंत, विजया कांबळे, उषा कोल्हे, पदमा माळवी, कमल कवठेकर, वंदना धनवडे, मंदाकिनी तरटे यांनी संमेलनाचे आयोजन केले होते.
ॲड. करुणा विमल यांनी संमेलनाची भूमिका मांडली. सूत्रसंचालन स्नेहा हुलस्वार तर आभार अंतिमा कोल्हापूरकर यांनी मानले. पहिल्या राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनात राज्यभरातून समतावादी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.













