Home Breaking News आजाद समाज पार्टी (कां.) आयोजित कार्यकारिणी व भीम आर्मी आढावा बैठक संपन्न

आजाद समाज पार्टी (कां.) आयोजित कार्यकारिणी व भीम आर्मी आढावा बैठक संपन्न

197

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी,पुसद यवतमाळ):-मो.78751 57855

पुसद(दि.25!ऑक्टोबर):-आजाद समाज पार्टी (कां.) आणि भीम आर्मी यवतमाळ आयोजित कार्यकारिणी तसेच आढावा बैठक दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी विश्राम गृह, पुसद येथे संपन्न झाली.

आगामी काळात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या – नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आजाद समाज पार्टी (कां.) युवा मोर्चा यवतमाळ जिल्हाच्या वतीने पुसद मध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवार देणार आहे असे बैठक दरम्यान जाहीर करण्यात आले.

बैठकीसाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची रूपरेषा, कार्यकारिणीचे आढावे, तसेच समाजातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अशोक भालेराव, भीम आर्मी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून दिलेले अधिकार प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे काम तरुण पिढीने केले पाहिजें आणि संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना सतत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. व

राजकुमार भगत, आजाद समाज पार्टी (कां.) युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष यांनी देखील संघटन बळकटीकरण साठी मार्गदर्शन केले त्यांनी असे सांगितले की आज आपल्यासमोर सर्वात मोठं काम आहे संघटना तळागळात जाऊन मजबूत करणे गावोगावी विभागागणिक आपली विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समतेची शिकवण पोहोचवणं हेच आपल्या कार्याचं केंद्रबिंदू आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला संघटनेचा प्रतिनिधी म्हणून सिद्ध कराव आणि आपल्याला काही मागायचं नाही आपल्याला आपल्या मेहनतीने संघटनेच्या शक्तीने मिळवायचा आहे. चला संघटित व्हा शिक्षित व्हा आणि संघर्ष करा पण संविधानाच्या मार्गानेच असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच आझाद समाज पार्टी युवा मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजकुमार भगत यांच्या हस्ते शरद खंदारे,यांची आजाद समाज पार्टी ग्रामीण तालुका अध्यक्ष पदीनिवड करण्यात आली तर सुदर्शन कांबळे यांची सुद्धा तालुका उपाध्यक्ष ग्रामीण पदी आणि प्रशिक कांबळे, रोहाडा सर्कल अध्यक्षपदी निवड करण्यात आली, यावेळी विशाल डाके, राज कांबळे, करण खंदारे, अंकुश देवकते, धोंडू ढोणे, सुदर्शन कांबळे, परमेश्वर भगत, विशाल खंदारे, अनिल कांबळे, भगवान खंदारे, वैभव सूर्यवंशी, राहुल धुळे, अजय लोखंडे, अश्विन कांबळे, राज कांबळे, गजानन ढोणे, दिनेश ढोणे, पंढरी आवळे, रामभाऊ ढोणे, शामराव ढोणे, गोपाल जगताप, इत्यादी संघटनेचे पदाधिकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत संपूर्ण कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि उत्साह संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीस बळकटी देणारी ठरली 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास वानखडे यांनी केले आणि आभार शरद खंदारे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here